शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडू यांच्याविरोधात आंदोलन ; आयुक्तांचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 15:18 IST

आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाविरुद्ध मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.

नाशिक : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाविरुद्ध मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. महापालिका आयुक्तांचे समर्थन करतानाच बच्चू कडू यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सोमवारी (दि.२४) आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अपंग बांधवांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेतली असता, त्यावेळी कडू यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर बच्चू कडू यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. नंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली होती. आयुक्तांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२५) महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र जमत प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. यावेळी ‘बच्चू कडू हाय हाय’च्या घोषणा देण्यात आल्या. बच्चू कडू यांच्यावर कठोर कारवाईचीही मागणी करण्यात आली. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, सभागृहनेता दिनकर पाटील, शिवसेनेचे गटनेता विलास शिंदे, भाजपाचे गटनेता संभाजी मोरुस्कर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे, अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष अनिल महाजन यांनी यावेळी भाषणे करत या साऱ्या प्रकरणात आयुक्तांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. शिवाय, बच्चू कडू यांची कृती निषेधार्ह असल्याचे सांगत कारवाईची मागणी करण्यात आली.