शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मागबारी घाटातील उंचवटे धोकादायक

By admin | Updated: February 15, 2017 23:08 IST

मागबारी घाटातील उंचवटे धोकादायक

खामखेडा : नामपूर-सटाणा- खामखेडा-कळवण-नाशिक राज्य महामार्ग क्रमांक सतरावरील धावणाऱ्या वाहनांसाठी धोकादायक ठरलेला मांगबारी घाटातील माथ्यावरील उंचवटा कमी करण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे .साक्र ी-नामपूर-सटाणा-खामखेडा -बेज-कळवण-नांदुरी-नाशिक हा राज्य महामार्ग सतराचा रस्ता असून, हा रस्ता नांदुरी गडावर व नाशिकला जाण्यासाठी भाविकांना जवळचा असल्याने या रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ असते. तसेच या रस्त्यावरून नोकरीनिमित्त मोठ्या प्रमाणात नोकरदार ये-जा करतात. या राज्य महामार्गावर पिंपळदर-खामखेडा गावाच्या दरम्यान मांगबारी घाट असून सदर मांगबारी घाटातील माथ्यावरील भाग आहे. या उंच भागामुळे घाटाचा चढावाचा रस्ता असल्याने येणारे वाहन जोरात असते. तर सटाण्याकडून येणारा रस्ता चढावाचा असल्याने खामखेड्याहून या मांगबारी घाटातून सटाण्याकडे येणारा रस्ता चढावाचा असल्याने समोरून येणारे वाहन उंच भाग असल्याने दिसत नाही, त्यामुळे अचानक दिसणाऱ्या वाहनांमुळे गोंधळ होऊन नेहमी अपघात होतात. घाटाचा रस्ता असल्याने खालून येणारे वाहन जोरात असते. त्याचप्रमाणे वरून येणारे वाहन उताराचा रस्ता असल्याने जोरात असते त्यामुळे अपघात होतात. आता सध्या रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण चालू आहे. तेव्हा सदर रस्त्यावरील मांगबारी घाटातील माथ्यावरील उंचवटा कमी करण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)