शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने केला मोटरसायकलचा पाठलाग

By admin | Updated: August 14, 2016 01:45 IST

एकजण जखमी : सायखेडा-सोनगाव रस्त्यावरील घटना

निफाड : सायखेडा सोनगाव रस्त्याने जाणाऱ्या सोनगाव येथील मोटारसायकलस्वाराचा बिबट्याने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सुमारे अर्धा किमीपर्यंत पाठलाग करून जखमी केल्याची घटना घडली़सोनगाव येथील सुभाष शंकर कारे हे सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसीमध्ये नोकरीला आहेत़ शुक्रवारी रात्री कारखान्यातील काम संपल्यानंतर कारे हे आपल्या सहकाऱ्यांबरोबर मोटारसायकलने घराकडे येत असताना रात्री १२ ते १२़३० च्या दरम्यान, सायखेडा गावापासून पुढे १ किमी अंतरावर आल्यानंतर सायखेडा सोनगाव रस्त्याजवळील भारत गॅस एजन्सीजवळ अचानक बिबट्याने कारे यांच्या मोटारसायकलवर झेप घेऊन कारे यांच्या पायावर हल्ला केला़ त्यामुळे कारे यांनी क्षणाचाही विचार न करता मोटरसायकलचा वेग वाढवला तरीही बिबट्याने अर्धा किमीपर्यंत त्यांच्या मोटरसायकलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळेस समोरून काही वाहने आल्यानंतर बिबट्या रस्त्याच्या बाजूला पसार झाला़ त्यानंतर जखमी कारे याना तातडीने नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात हलवण्यात आले़ त्याच्या पायाला जखम झाली आहे घटनेची माहिती मिळताच येवला वन विभागाचे वन परी क्षेत्र अधिकारी बी.आर.ढाकरें, मनमाड चे वनपाल ए. पी.काळे, वनरक्षक विजय टेकणर यांनी घटनास्थळी भेट दिली.पंचनामा केला जखमी कारे यांची भेट घेतली बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अविनाश खालकर यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला आहे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे़(वार्ताहर)