शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातूनच सराईत गुन्हेगार मोरेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:11 IST

दिंडोरी रोडवरील (कलानगर) येथे चार ते पाच संशयितांनी सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहर अध्यक्ष निखिल ऊर्फ बाल्या मनोहर मोरे (२८) याची पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली होती.

पंचवटी : दिंडोरी रोडवरील (कलानगर) येथे चार ते पाच संशयितांनी सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहर अध्यक्ष निखिल ऊर्फ बाल्या मनोहर मोरे (२८) याची पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चार-पाच संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरिफ कुरेशी व सागर चंद्रमोरे या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलानगर परिसरातील निखिल मोरे याचा परिसरातच राहणारे संशयित आरोपी आरिफ कुरेशी, शरद पगारे, अमर गांगुर्डे, रोशन पगारे व त्यांच्या अन्य साथीदारांबरोबर पूर्वी वाद झाले होते. गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजता सूरज खोडे, मयत निखिल मोरे, अमोल निकम हे कलानगर येथील व्यंकटेश कृपा अपार्टमेंट येथील हॅपी गेम झोन दुकानाच्या पायरीवर बसलेले होते़ त्यावेळी संशयित जॉन काजळे हा तिथे आला व निखिल मोरे यास तू प्रवीण काकडला आरिफ यास मारण्यास सांगतो असे म्हणून हातातील धारदार शस्त्राने मोरे याच्यावर वार केले़ यानंतर संशयित शरद पगारे याने हातातील पिस्तुलातून तीन गोळ्या हवेत झाडल्या, तर मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या अमोल निकम व फिर्यादी खोडे यांच्यावरही अमर गांगुर्डे याने शस्त्राने वार केल्याने ते जखमी झाले़ तर आरिफ कुरेशी याने मोरेवर हातातील शस्त्राने वार केले. यानंतर संशयित पसार झाले. या घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, आनंदा वाघ, सुनीलकुमार पुजारी यांनी घटनास्थळी भेट दिली होती.