शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी गटात चौरंगी लढत

By admin | Updated: February 16, 2017 00:18 IST

राष्ट्रवादीसमोर बंडखोरांचे आव्हान : शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला

 भगवान गायकवाड दिंडोरीदिंडोरी नगरपंचायत झाल्याने गटाची फेररचना होत नव्याने उदयास आलेला मोहाडी गट हा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असून, या गटात शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजपा व कॉँग्रेस अशी चौरंगी लढत होत आहे. उमेदवार जरी राखीव प्रवर्गातील असले तरी खुल्या वर्गातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. विद्यमान जि.प. सदस्य शिवसेनेचे गटनेते प्रवीण जाधव व त्यांचे परंपरागत विरोधक कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी यांच्या गटात वर्चस्वाची लढाई रंगत असताना शिवसेनेची उमेदवारी न मिळालेल्या तुकाराम जोंधळे या शिवसैनिकाने भाजपात प्रवेश करत काटशह दिल्याने शिवसेनेला आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी भाजपा सोबतच कॉँग्रेस राष्ट्रवादीच्या कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.मोहाडी गटात पूर्वी शेकापचे तर मध्यंतरी काँग्रेसपुढे राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व ठेवले. मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेने शेकापचे नेते एकनाथ जाधव यांचे पुत्र प्रवीण जाधव यांना उतरवत राष्ट्रवादीला धोबीपछाड देत शिवसेनेचा भगवा फडकावला. प्रवीण जाधव जिल्हा परिषदेत शिवसेनेचे गटनेते झाले. त्यांनी या गटात आपली मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा गट अनुसूचित जमाती महिला यासाठी राखीव झाल्याने त्यांची पुन्हा जिल्हा परिषदेत जाण्याची संधी हुकली आहे. मात्र त्यांनी गटात शिवसेनेची सत्ता कायम राखण्यासाठी आपल्या सहकारी शिवसैनिकांशी पंगा घेत मोहाडी गावातील सारिका नेहरे यांना उमेदवारी देत तिकिटाची पक्षांतर्गत लढाई जिंकली आहे. तुकाराम जोंधळे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत भारती जोंधळे यांना उमेदवारी देत शिवसेनेला काटशह दिला आहे. प्रवीण जाधव यांना शह देण्यासाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादीने एकास एक उमेदवार देण्याची रणनीती आखत भारती जोंधळे यांना उमेदवारी देऊ केली. मात्र त्यांनी सत्ताधारी भाजपाला आपलेसे केल्यानंतर कॉँग्रेस व राष्ट्रवादीनेही स्वतंत्र उमेदवार देत मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी रणनीती आखली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने मोहाडी येथील मीना पोटिंदे यांना उमेदवारी देत शिवसेनेपुढे आव्हान उभे करताना मोहाडी गणात जानोरी येथील, तर पालखेड गणात उच्चशिक्षित महिलेला मैदानात उतरवले आहे. कॉँग्रेसने गटात जानोरीच्या कमल केंग यांना उमेदवारी दिली असून, गणातही जानोरी गावाचे तर पालखेड गणात पालखेडचा उमेदवार देत रणनीती आखली आहे. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार रामदास चारोस्कर यांना या गटात मिळालेल्या मतांवर कॉँग्रेसची मदार आहे; मात्र बदलत्या राजकीय समीकरणांत कॉँग्रेसला येथे आव्हान कायम ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. शिवसेनेची मदार प्रवीण जाधव यांच्यावर राहणार आहे. त्यांनीही मोहाडी गणात जानोरीचा, तर पालखेड गणात पालखेडचा उमेदवार घेत आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. ४राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही गाजावाजा न करता गेल्यावेळी मिळालेली मते जरी यंदा राखली तरी सहज विजय शक्य आहे असे आपल्या कार्यकर्त्यांना पटवत शिस्तबद्ध प्रचार करत गेल्यावेळी निसटता झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची रणनीती आखली आहे. भाजपाची मदारही जोंधळे यांच्यावर आहे. जोंधळे यांच्या शिवसैनिक, मित्रपरिवार त्यांची एकगठ्ठा मते भाजपाच्या पदरात पडावी या विचाराचे भाजपाने मोहाडी व पालखेड गणात देत रणनीती आखली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेचे प्रवीण जाधव यांच्या झंझावातापुढे एकतर्फी लढतीचे निर्माण झालेले चित्र तुकाराम जोंधळे यांच्या बंडाने राष्ट्रवादीला उभारी देणारे ठरले असून, शिवसेनेला आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी स्वकीयांच्या बंडाचा सामना करत राष्ट्रवादीचे आव्हान पेलावे लागणार आहे.