शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला कंगाल करण्याचा मोदींचा डाव

By admin | Updated: August 13, 2014 00:43 IST

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांचा आरोप

नाशिक : एकेकाळी गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान राहिलेल्या मोरारजी देसाई यांनी मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला होता. आताही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई गुजरातला जोडून महाराष्ट्राला कंगाल करण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला.आमदार चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हा व शहर महिला पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी कॉँग्रेस भवनात आयोजित करण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसने नेमकी काय भूमिका घ्यावी, पक्षाच्या योजना घराघरांत कशा पोहोचवाव्यात याबाबत मार्गदर्शन व माहिती या आढावा बैठकीत आमदार चव्हाण व प्रभारी उषाताई दराडे यांनी दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार चव्हाण यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली. महिलांना लोकसभा व विधानसभेमध्ये ५० टक्के आरक्षण देण्याबाबत आमचा पक्ष आग्रही आहे. केंद्रात मुलायमसिंह व लालूप्रसाद यादव यांनी विरोध केल्यामुळे महिलांना संसदेत ५० टक्के आरक्षणाचा कायदा कॉँग्रेसप्रणीत आघाडी सरकारला संमत करता आला नाही. आता मात्र मोदी सरकारकडे बहुमत असल्याने त्यांनी हा कायदा तातडीने संमत करून घ्यावा, असा टोमणाही त्यांनी मारला. त्याचप्रमाणे अच्छे दिन आयेंगे म्हणत लोकांना स्वप्ने दाखविणाऱ्या नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली असून, जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. मुंबईतील सर्व व्यापार गुजरातला जोडून महाराष्ट्राला कंगाल करण्याचा नरेंद्र मोदींचा डाव असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आठ-दहा वर्षांपासून ब्लू प्रिंटच्या नावाखाली लोकांना वेड्यात काढणाऱ्या आणि फिल्मी डायलॉग म्हणणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनाही जनता घरीच बसवणार आहे. कारण मुंबईत काय आणि नाशिकला काय, सेना-मनसेला सत्ता देऊन जनता कंटाळली आहे, असे आमदार विद्या चव्हाण यांनी सांगितले. यावेळी रेखाताई फष्टे, शुभांगी जगताप, शोभा मगर, जि. प. सभापती अलका जाधव, सदस्य डॉ. भारती पवार, कविता कर्डक, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, छबू नागरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)इन्फो.. दहीहंडीला विरोधचन्यायालयाने बाल गोविंदांना आणि १८ वर्षांच्या आतील मुलांना गोविंदा पथकात सामील करण्यास बंदी घातली असून, महिला राष्ट्रवादी कॉँग्रेस या निर्णयाचा आदरच करते. बाल गोविंदांना दहीहंडी पथकात सामील करता कामा नये, असेही आमदार विद्या चव्हाण यांनी सांगितले.