शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीच्या मतदानाचे होणार मॉकड्रिल

By admin | Updated: July 8, 2016 00:29 IST

आयोगाची सूचना : बूथसंख्या, मतदानकेंद्र वाढणार

नाशिक : मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभागरचना निश्चित करण्यात आल्याने त्यादृष्टीने मतदानाची तयारी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूक शाखेला दिले आहेत. त्यानुसार, लवकरच निवडणुकीच्या मतदानाचे मॉकड्रिल (प्रात्यक्षिक)करत बूथसंख्या आणि मतदान केंद्रे निश्चित केली जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी व अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली.येत्या आठ महिन्यांवर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली असून राज्य निवडणूक आयोगाने यंदा बहुसदस्यीय प्रभागरचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एका प्रभागात तीनपेक्षा अधिक आणि पाचपेक्षा कमी सदस्यसंख्या असणार आहे. प्रामुख्याने एका प्रभागात चार सदस्य निवडून द्यावे लागणार आहे. त्यामुळे मतदान यंत्रावर उमेदवारांची संख्या वाढणार असल्याने आणि प्रभागाची मतदारसंख्या वाढणार असल्याने राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला त्यादृष्टीने आतापासूनच तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. आगामी महापालिका निवडणूक ही सन २०११ च्या जनगणनेनुसार घेण्यात येणार असून १२२ सदस्यसंख्या राहण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे एका प्रभागाची मतदारसंख्या सुमारे ३५ ते ४० हजाराच्या आसपास असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बूथ आणि मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. पहिल्यांदाच चार सदस्यांचा प्रभाग होणार असल्याने प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी काही अडचणी येऊ नये आणि कोणत्याही त्रुटी राहू नये याकरिता महापालिकेला मतदानाचे मॉकड्रिल घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार, लवकरच मॉकड्रिल घेण्यात येणार असल्याची माहिती अनिल चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)