शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘सानू-टोनू-मोनू’ गँगवर ‘मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST

शहरात खून, प्राणघातक हल्ले यांसारखे शरीराविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी परिमंडळ-१ व २ मधील संघटित गुन्हेगारी ...

शहरात खून, प्राणघातक हल्ले यांसारखे शरीराविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी परिमंडळ-१ व २ मधील संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांची जंत्री काढत तपासाचे आदेश दिले आहे. यानुसार नाशिक रोड-उपनगर भागात दहशत माजवून कायदा सुव्यवस्थेला वारंवार धोक्यात आणणाऱ्या सानू-टोनू-मोनूच्या टोळीवर अखेर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात टोळीतील एकूण ११ संशयितांसह तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित डझनभर संशयित फरार आहेत. यामध्ये काही संशयित गुन्हेगार हे अंधेरी, उल्हासनगर, कल्याण या शहरांमधील आहे. तसेच काही नाशिक शहर व परिसरातील असून त्यांनी शहरातून परजिल्ह्यांमध्ये आश्रय घेतला असून सर्वांना लवकरात लवकर अटक करण्यास पोलिसांना यश येईल, असा आशावाद पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केला. यावेळी उपायुक्त विजय खरात, पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, अनिल शिंदे उपस्थित होते.

--इन्फो--

टोळीमधील हे गुन्हेगार गजाआड

टोळीप्रमुख सागर सुरेश म्हस्के ऊर्फ सानू पाईकराव (२२,जेलरोड), हर्ष सुरेश म्हस्के ऊर्फ टोनू पाईकराव, साहिल सुरेश म्हस्के ऊर्फ मोनू पाईकराव (२०)

रोहित सुरेश लोंढे ऊर्फ भुऱ्या (२१,रा.देवळाली गाव), जय ऊर्फ मारुती वाल्मीक घोरपडे (१८,रा.विहितगाव), राहुल भारत तेलारे उर्फ भांडा (१९,रा.बागुलनगर), कलाम सलीम राईन (१९,रा.नाशिकरोड), सत्तू बहीरु राजपूत (२०,रा.जयभवानी रोड), जॉन चलन पडेची (२८,रा.देवळाली कॅम्प), योगेश श्रावण बोडके (२३,रा.पंचवटी), अमन हिरालाल वर्मा उर्फ मामा (३५,रा.समतानगर,अंधेरी), यांच्यासह तीन अल्पवयीन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी चायल याच्या खुनाच्या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, दुचाकी वाहनांसह कोयता, चाकू ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.