शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीसाठी ‘इव्हीएम’ मशीनची जमवाजमव

By admin | Updated: February 4, 2017 23:14 IST

४५७० मशीन प्राप्त : उद्या होणार तांत्रिक तपासणी

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण उमेदवारांची संख्या येत्या ७ फेबु्रवारीला माघारीनंतर निश्चित होणार आहे. त्यापूर्वीच, मनपा प्रशासनाने मतदानासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीनची जमवाजमव सुरू केली असून, आतापर्यंत ४५७० बॅलेट युनिट मनपाकडे प्राप्त झाले आहेत.  महापालिका निवडणुकीसाठी यंदा बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबविली जात असून, ३१ प्रभागांसाठी १२२ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. महापालिकेने निवडणुकीसाठी शहरात १४३३ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. प्रत्येक प्रभागात चार सदस्य निवडून द्यायचे असून, प्रत्येक गटासाठी वेगवेगळी मतपत्रिका असणार आहे. त्यासाठी वेगवेगळे बॅलेट युनिट उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.  महापालिकेकडे आतापर्यंत १६२९ कंट्रोल युनिट तर ४५७० बॅलेट युनिट प्राप्त झाले आहेत. त्यासाठी १५९५ मेमरी कार्ड प्राप्त झाले आहेत. त्यात अजून २५ मेमरीची गरज भासणार आहे. त्याचीही मागणी नोंदविण्यात आली आहे. सदर इव्हीएम मशीन अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून आणण्यात आली आहेत. येत्या ७ फेबु्रवारीला अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची संख्या स्पष्ट होईल. त्यानुसार, बॅलेट युनिटची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. गरज भासल्यास आणखी बॅलेट युनिटची मागणी आयोगाकडे नोंदविली जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.  सदर इव्हीएम मशीनची फर्स्ट लेव्हल चेकिंग येत्या ६ व ७ फेबु्रवारीला मनपाच्या विद्युत विभागामार्फत केली जाणार आहे. त्यानंतर अद्ययावत इव्हीएम यंत्रे प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याला वितरित केली जाणार आहे. (प्रतिनिधी)