शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

‘अग्नि’शमन ठेक्यावरून मनसेत ‘भडका’

By admin | Updated: August 15, 2014 00:37 IST

‘अग्नि’शमन ठेक्यावरून मनसेत ‘भडका’

 

नाशिक : मनसेत सुरू असलेल्या गटबाजीचे शोले अग्निशमन दलाच्या एका ठेक्याच्या निमित्ताने अधिकच भडकले आहेत. मनसेच्या ताब्यात असलेल्या स्थायी समितीने गेल्या महिन्यात पालिकेच्या प्रमुख इमारतींमध्ये अग्निप्रतिरोध यंत्रणा बसविण्याच्या ठेक्यास मान्यता दिली होती; परंतु त्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेत काळेबेरे असल्याचा आक्षेप मनसेचे आमदार वसंत गिते यांनी केला. त्याचाच संदर्भ घेऊन महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी ही निविदाप्रक्रिया रद्द करण्याची घोषणा महासभेत केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित ठेकेदार मनसेचाच असल्याचे समजते.स्थायी समिती सभापतिपदी राहुल ढिकले यांच्या निवडीसाठी झालेल्या प्रयत्नातूनच ही गटबाजी उघड झाली. पक्षातील ज्येष्ठ असलेले आमदार वसंत गिते यांना या सर्व प्रक्रियेपासून दूर ठेवल्याने ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे महापौर अ‍ॅड. यतिन वाघ त्यांच्या अधिक जवळ आहेत. गेल्या महिन्यात स्थायी समितीची बैठक झाली. त्यात महापालिकेच्या राजीव गांधी भवनासह विविध विभागीय कार्यालये, तसेच कालिदास कलामंदिर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह आणि इंदिरा गांधी रुग्णालयात अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्याचे काम दाह शामक नामक या ठेकेदारास देण्यात आले. सुमारे चार कोटी रुपयांची ही कामे एकाच ठेकेदारास देण्यात आली असून, हा सारा कारभार शांततेत पार पडल्याने त्याचवेळी साऱ्याच सदस्यांचा ‘दाह’ एकाच वेळी शांत झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता.दरम्यान, बुधवारी झालेल्या महासभेत अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांनी आमदार वसंत गिते यांनी आयुक्तांना दिलेले पत्र आपल्याला मिळाले असल्याचे सांगून ते सभागृहात वाचून दाखवले. अग्निशमन उपकरणे बसविण्याच्या निविदाप्रक्रियेत विशिष्ट ठेकेदारालाच ठेके मिळावे, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सदरचा ठेका रद्द करावा, अशी मागणी गिते यांनी केली होती. त्याचा आधार घेऊन संजय चव्हाण यांनी अग्निशमन दलातील कारभारावर टीका केली. त्यानंतर महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी सदरची निविदा रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे सभापती ढिकले यांच्यावर गिते आणि महापौरांनी कडी केली आहे. यापूर्वी प्रसूतिगृहात सुरक्षारक्षक नियुक्तीचा ठेका महासभेने रद्द केल्यानंतर स्थायी समिती सभापतींनी हा प्रस्ताव स्थायी समितीवर मांडून मंजूर केला होता. त्यामुळे महापौरांच्या अधिकाराला सभापतींनी आव्हान दिले होते. त्याची परतफेड महापौरांनी केली आहे. (प्रतिनिधी)