शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मनसेला आली जाग, कामांसाठी भागम्भाग पालिकेवर धडक : मंजूर कामांच्या अंमलबजावणीसाठी आग्रह

By admin | Updated: May 24, 2014 00:56 IST

नाशिक : महापालिकेत दोन वर्षे सत्ता भोगणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगिरीवर नाखूश मतदारांनी लोकसभेत झटका दिल्यानंतर आता या पक्षाला नागरिकांच्या समस्यांविषयी जाग आली असून, त्यातून आज आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या दालनात धडक मारण्यात आली. रस्ते, गटारी, घंटागाड्या अशा विविध कारणांवर कारवाईची मागणी करतानाच चुका प्रशासनाच्या परंतु दोष मात्र मनसेवर येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नाशिक : महापालिकेत दोन वर्षे सत्ता भोगणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगिरीवर नाखूश मतदारांनी लोकसभेत झटका दिल्यानंतर आता या पक्षाला नागरिकांच्या समस्यांविषयी जाग आली असून, त्यातून आज आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या दालनात धडक मारण्यात आली. रस्ते, गटारी, घंटागाड्या अशा विविध कारणांवर कारवाईची मागणी करतानाच चुका प्रशासनाच्या परंतु दोष मात्र मनसेवर येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.लोकसभा निवडणुकीत मनसेची महापालिकेतील कामगिरी हा महत्त्वाचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. दोन वर्षांत पालिकेत कोणतीही कामे झालेली नाहीत, अशी टीका झाली आहेत. या निवडणुकीत मनसेचे डिपॉझिट जप्त झाले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत तरी अडचणी उद्भवू नये यासाठी मनसेला आता जाग आली आहे. त्यानुसार आज धडक देण्यात आली.आमदार गिते, महापौर ॲड. यतिन वाघ, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे आणि प्रकाश दायमा, शहराध्यक्ष राहुल ढिकले, सभागृह नेता शशिकांत जाधव, गटनेता अशोक सातभाई यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नगरसेवक यावेळी उपस्थित होते. शहरात रिलायन्स फोर-जीसाठी फोडलेले रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, गंगापूररोड येथे महापालिका रस्ता विकसित करीत असून, त्याठिकाणी झाडांची मुळे उघडी पडल्याने झाडे कोसळून अपघात होऊ शकतात. त्यामुळे आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. पावसाळा तोंडावर आला असताना अद्याप पावसाळापूर्व कामे सुरू झालेली नाहीत. ती त्वरित सुरू करावीत, झोपडप˜्यांमधील उघड्या गटारी त्वरित स्वच्छ कराव्यात. त्याचप्रमाणे घंटागाड्या आणि कचरा यांची प्रमुख समस्या असून, घंटागाड्यांची दुरवस्था झाल्याने त्या भंगारात काढून नवीन घंटागाड्या खरेदी कराव्या, यासंदर्भात ठराव करूनही अंमलबजावणी झालेली नाही ती करावी, प्रमुख रस्ते दुरुस्त करावेत, शववाहिका आणि व्हॅक्युम एम्टीयर वाहनांची खरेदी करावी, धूर फवारणीच होत नसल्याने कडक कारवाई करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी रमेश धोंगडे, यशवंत निकुळे, रूची कुंभारकर, सुरेखा भोसले, सुवर्णा मटाले, सुनीता मोटकरी यांच्यासह अन्य नगरसेवक यावेळी उपस्थित होते.