शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेला हवे चव्हाण, कॉँग्रेसला ठाकरे !

By admin | Updated: February 14, 2017 01:59 IST

नाशिक मनपा : उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे साकडे

नाशिक : कॉँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, परंतु त्यांना आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी हवे आहेत राज ठाकरे, तर मनसेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आपले उमेदवार विजयी करण्यासाठी हवे आहे, अशोक चव्हाण! अजब वाटेल ना... परंतु हे खरे आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाच्या उमेदवारांची कुठे युती-आघाडी होईल हे सांगता येत नाही, त्यातही पक्षाची परिस्थिती फारशी चांगली नसेल, तर मग सक्षम उमेदवार सांगतील तसे पक्षाच्या नेत्यांना मान्य करावे लागते. नाशिकच्या दोन प्रभागांत कॉँग्रेस आणि मनसेत असाच प्रकार घडला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये कॉँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या शाहु खैरे यांनी आपल्या प्रभागातील उमेदवार ठरवून घेतले. त्यावेळी त्यांच्यासमवेत कॉँग्रेसच्या पक्षाच्या विद्यमान नगरसेवक वत्सला खैरे या त्यांच्याबरोबरच आहेत, परंतु राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक गजानन शेलार आणि महिला गटातून मनसेच्या उमेदवार तथा नगरसेवक सुरेखा भोसले यांना समवेत घेतले आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळालेले कॉँग्रेस आणि मनसेतील इच्छुक नाराज आहेत. केवळ कॉँग्रेसच नाही, तर मनसेनेही भोसले यांना अशाप्रकारचे पॅनल करण्यासाठी सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येते. पुरेसे सक्षम उमेदवार मिळत नसल्याची सर्वच पक्षांची ओरड असून, अशावेळी भौगोलिक क्षेत्राचा विचार करता चार भागांतील चार उमेदवार असले पाहिजे, या गरजेतून हे पॅनल तयार झाले. त्यामुळे मनसे आणि कॉँग्रेसमध्ये विशेषत: ज्या कार्यकर्त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली नाही ते नाराज आहेत. त्यातून हा प्रकार सुरू झाला आहे.  मनसेचे मनोज घोडके यांनी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पत्र पाठविले असून, आपल्या पक्षाच्या उमेदवाराने कॉँग्रेसबरोबर आघाडी केल्याने आता त्यांच्या प्रचारासाठी आपण प्रभागात सभा घ्यावी, अशी मागणी केली आहे, तर कॉँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वसंत ठाकूर यांनी मनसेचे शहर संपर्काध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांची भेट घेतली आणि कॉँग्रेस-मनसे आघाडी झाल्याने कॉँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांचा मध्य नाशिकमधील प्रभाग १३ मध्ये रोड शो घ्यावा, अशी मागणी केली आहे. अभ्यंकर यांनी ठाकूर यांचे राज यांच्याशी बोलणे करून देण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र अद्याप अशी चर्चा होऊ शकली नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले.