शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

निकालाआधीच मनसेची साफसफाई शहराध्यक्षपदी ढिकले: जिल्हाध्यक्षांसह अनेक खांदेपालट होणार

By admin | Updated: May 16, 2014 00:19 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच नाशिकमध्ये येऊन ऑडिट करणार्‍या राज ठाकरे यांनी पक्षात साफसफाई सुरू केली असून, पक्षाच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक राहुल ढिकले यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच जिल्हाप्रमुख, पालिकेतील सत्ताधिकारी पदाधिकार्‍यांमध्येही बदल होणार आहेत.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच नाशिकमध्ये येऊन ऑडिट करणार्‍या राज ठाकरे यांनी पक्षात साफसफाई सुरू केली असून, पक्षाच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक राहुल ढिकले यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच जिल्हाप्रमुख, पालिकेतील सत्ताधिकारी पदाधिकार्‍यांमध्येही बदल होणार आहेत.राज ठाकरे यांच्या दृष्टीने नाशिक हा बालेकिल्ला आहे. तीन आमदारांबरोबरच चाळीस नगरसेवक निवडून आल्याने मनसे पालिकेत सत्तेवर आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांना नाशिककडून मोठी अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, या निवडणुकीत मनसेच्या अनेक चुका झाल्याच्या तसेच फितुरीच्या तक्रारी राज यांच्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच गेल्या शुक्रवारी अचानक नाशिकमध्ये येऊन राज ठाकरे यांनी निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेतला. प्रत्येक नगरसेवकाशी एकेक करून चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी लोकसभा निवडणुकीचा निर्णय लागण्याच्या आतच राज ठाकरे यांनी सफाई मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसारच अवघ्या चार महिन्यांपूर्वी नियुक्त केलेल्या समीर शेटे यांना हटवून त्यांच्या जागी पंचवटीतील मनसे नगरसेवक ॲड. राहुल ढिकले यांची नियुक्ती केली आहे. समीर शेटे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती यापूर्वीच केली होती असे समजते. याच कारणामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा सहभाग मर्यादित होता. त्यामुळे त्यांना हटवून राहुल ढिकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज मुंबई येथे ढिकले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार वसंत गिते उपस्थित होते.लवकरच जिल्हाध्यक्ष आणि पालिकेतील गटनेते यांच्यात बदल होण्याचीही शक्यता आहे. जिल्हाप्रमुख पदासाठी अशोक मुर्तडक आणि डॉ. प्रदीप पवार यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय पालिकेतील गटनेते अशोक सातभाई यांनी आपली वर्षभराची मुदत संपल्याचे अगोदरच पक्षाला कळवले आहे. त्यामुळे गटनेता आणि सभागृह नेत्यांच्या बदलाचीही शक्यता वर्तवली जात आहे.जोड आहे...