शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांच्या मर्यादेतून आमदार-खासदारांची सुटका

By admin | Updated: July 16, 2016 00:36 IST

वित्त विभागाचा निर्णय

 नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्याबरोबरच तीन लाखांच्या पुढील कोणत्याही कामांसाठी ई-निविदा लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधी आमदारांसह सत्ताधारी आमदारांची नाराजी ओढवून घेतली होती. अखेर वित्त विभागाने आता आमदारांसह खासदारांच्या स्थानिक विकास निधीच्या कामांना मुख्यमंत्र्यांच्या तीन लाखांचा ई-निविदा निर्णयातून ‘मुक्त’ केले आहे.१२ जुलै २०१६ या वित्त विभागाच्या निर्णयाने आमदार-खासदारांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्था जसे महापालिका-जिल्हा परिषद लोकप्रतिनिधींबरोबर मजूर सहकारी संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे. हा निर्णय केवळ आमदार-खासदार यांच्या स्थानिक विकास निधींसाठी नव्हे तर सर्वच विकासकामांसाठी लागू करण्याची मागणी आता या घटकांमधून करण्यात येत आहे. १२ जुलै २०१६च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयात आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत, यापूर्वी निर्गमित केलेल्या सर्व शासन निर्णयांचा तसेच खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून, होणाऱ्या कामांच्या व्याप्ती आणि कार्यपद्धती यामध्ये अध्ययन करून अधिक गतिमान पद्धतीने कामे होण्याकरिता यापूर्वीच सर्व शासन निर्णय, शासन परिपत्रके व शासन पत्रे अधिक्रमित करून सर्व समावेशक मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात येत असल्याचे निर्णयात म्हटले आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या संघटनेने हा निर्णय सर्वांसाठीच लागू करावा, अन्यथा याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरूकेली आहे. (प्रतिनिधी)