शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वीजप्रश्नी बैठकीला आमदारांची दांडी

By admin | Updated: February 1, 2016 23:44 IST

उद्योजक नाराज : अनिल कदम उद्योगमंत्र्यांकडे मांडणार कैफियत

 सातपूर : औद्योगिक संघटनांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी शहरातील भाजपाचे आमदार अनुपस्थित राहिल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली, तर एकमेव उपस्थित शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी भाजपाची खिल्ली उडवत शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई हेच वीजदरासंदर्भातील तोडगा काढतील, असे सांगून उद्योजकांना आश्वस्त केले, तर उद्योजकांनी उत्तर महाराष्ट्र स्तरावर आंदोलन छेडण्याचा निर्णय जाहीर केला.राज्य सरकारने फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांसाठी विजेच्या दरात सवलत देण्याच्या निर्णयावर जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींसमवेत औद्योगिक संघटनांची निमात बैठक बोलाविण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेऊन दुजाभाव केला आहे. उद्योग खाते शिवसेनेकडे असून, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मंगळवारी (दि.२) हा मुद्दा उपस्थित करून अन्याय दूर करण्याची मागणी करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, संतोष मंडलेचा, विवेक पाटील, संजय महाजन, मनीष कोठारी, मंगेश पाटणकर, मिलिंद राजपूत, नगरसेवक शशिकांत जाधव, आशिष नहार, सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे, व्हीनस वाणी, मनीष रावळ, अजय बाहेती, सुरेंद्र मिश्रा आदिंनी या निर्णयामुळे जिल्ह्णातील स्टील, प्लास्टिक, कास्टिंग, प्लेटिंग या उद्योगांवर होणारा परिणाम, उद्योग उजाड होतील, सरकारने केलेला दुजाभाव अन्यायकारक आहे. उद्योजकांमध्ये निर्माण केलेला वाद विदर्भ वेगळा करण्याचा हा डाव असल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात आली. या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच लवकरच उर्वरित महाराष्ट्रातील औद्योगिक संघटनांची बैठक बोलावून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)