शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

भारत विकासात चीनच्या पुढे, हा गैरसमज

By admin | Updated: April 11, 2015 00:30 IST

नरेंद्र जाधव : क. का. वाघ स्मृती व्याख्यानात केले प्रतिपादन

नाशिक : भारताने आर्थिक विकासात चीनला मागे टाकल्याची वृत्ते मूर्खपणाची असून, चीनचे दरडोई उत्पन्न भारताच्या पाचपट आहे. आपण या वर्षी केवळ चीनएवढा विकासदर गाठला असून, चीनला मागे टाकण्यासाठी कित्येक वर्ष लागणार असल्याचे वास्तव ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी मांडले. कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षणसंस्थेच्या वतीने कर्मवीर वाघ स्मृती व्याख्यानमालेचे बारावे पुष्प शंकराचार्य संकुलात गुंफण्यात आले. पुणे विद्यापीठ उपविभागीय केंद्राचे समन्वयक प्रा. रावसाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. डॉ. जाधव यांनी ‘भारताच्या आर्थिक धोरणाचे प्रतिबिंब : सन २०२० पर्यंत’ या विषयावर विवेचन केले. भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल, बदल व आव्हाने अशा तीन टप्प्यांत मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सन १९४७ पर्यंत भारताचा विकासदर शून्य टक्के होता. १९५१ पासून भारताने नियोजनबद्ध विकासाला सुरुवात केली.१९९१ पर्यंतच्या चाळीस वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली; मात्र १९७० ते ८० या काळात देशात परमीट राज बोकाळले. त्यामुळे उद्योगांच्या विकासाला खीळ बसली. परकीय गंगाजळी आटून देश प्रचंड आर्थिक संकटात सापडला. १९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी परमीट राज बंद करून मुक्त अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे साडेतीन टक्क्यांवर अडून बसलेला देशाचा विकासदर ९ टक्क्यांवर पोहोचला. २००१ मध्ये भारत व चीन हे दोन देश प्रथमच जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटले; मात्र भारताने चीनवर मात केली, असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश कडवे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. एस. भंडारी यांनी परिचय करून दिला. वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जे. जी. सुलक्षणे व एन. एस. रंधवे यांनी सूत्रसंचालन केले. वाय. डी. जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)