शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमधून पळालेली अल्पवयीन मुले नाशकात गवसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:14 IST

नागपूरच्या गोपालनगर येथील रहिवाशी असलेले १५ ते १६ वर्षे वयोगटांतील तिघेही मित्र अचानकपणे त्यांच्या राहत्या घरातून कोणाला काहीही न ...

नागपूरच्या गोपालनगर येथील रहिवाशी असलेले १५ ते १६ वर्षे वयोगटांतील तिघेही मित्र अचानकपणे त्यांच्या राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेले होते. तिघा अल्पवयीन मुलांच्या नातेवाइकांनी त्यांचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते कोठेही आढळून न आल्याने त्यांनी नागपूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. यानुसार, तिघे मुले बेपत्ता झाल्याची तक्रार प्रतापनगर पोलिसांनी नोंदवून घेत, त्यांची छायाचित्रे, आधार्ड कार्डाचे फोटो काढून घेत, ते सर्व पोलीस ठाण्यांसह रेल्वे पोलिसांना तत्काळ व्हायरल केले. या छायाचित्रांवरून या तिघा मुलांचा पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाकडून शोध सुरू झाला. दरम्यान, शनिवारी (दि.१३) हा संदेश नाशिक रेल्वे पोलिसांपर्यंत येऊन धडकला. रेल्वे सुरक्षा दल व गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. या पथकाने गीतांजली एक्स्प्रेसची झडती घेण्यास सुरुवात केली. जळगाव सोडल्यानंतर या रेल्वेच्या एका बोगीत ही तिन्ही मुले बसलेली पथकाला आढळून आली. त्यांनी मोबाइलमध्ये असलेल्या छायाचित्रांवरून त्यांची ओळख पटवून त्यांना विश्वासात घेतले. नाशिकरोड येथे संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गीतांजली एक्स्प्रेस पोहोचताच या मुलांना पथकाने सुखरूपपणे उतरवून आरपीएफ पोलीस ठाण्यात आणले. तेथून नागपूर प्रातपनगर पोलिसांना याबाबत वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांकडून तिन्ही मुले सापडल्याची माहिती कळविण्यात आली. या तीनही मुलांना रेल्वे पोलिसांनी सुरक्षितरीत्या बाल कल्याण समितीकडे सोपविले. दरम्यान, या तीनही मुलांचे पालक नाशकात आल्यानंतर, समितीकडून पुढील कार्यवाही करून तिघांना त्यांच्या पालकांकडे सोपविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.