शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

धामोडे ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 01:06 IST

येवला तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेचा सुमारे ३९ लाख ३९ हजार ३१९ रुपये इतका निधी रोजगार सेवकानेच हडप केल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देबनावट चेकद्वारे ३९ लाख रु पये हडप

येवला : तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेचा सुमारे ३९ लाख ३९ हजार ३१९ रुपये इतका निधी रोजगार सेवकानेच हडप केल्याचे उघडकीस आले आहे.धामोडे ग्रामपंचायतीमधील रोजगार हमी योजनेच्या नियोजन कामासाठी कंत्राटी ग्रामरोजगार सेवक म्हणून संशयित आरोपी मंगेश तानाजी भड (३०) रा. धामोडे हल्ली, विठ्ठलनगर येवला याची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामपंचायत व बँकेमधील आर्थिक व्यवहारांची माहिती संशयित आरोपी मंगेश भड यास होती, याचाच गैरफायदा घेत सदर आरोपीने दि. २२ एप्रिल ते २८ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत धामोडे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामधून देना बँक व अ‍ॅक्सिस बँकेच्या चेकबुकमधील काही चेक काढून घेऊन त्या चेकवर तत्कालीन सरपंच शोभा नामदेव भड (रा. धामोडे) व तत्कालीन ग्रामसेवक गंगाधर काशीराम गवळी यांच्या बनावट सह्या करून व बनावट शिक्के मारून बँकेमध्ये आरटीजीएसद्वारे सुमारे ३९ लाख ३९ हजार ३१९ रुपये इतका मोठा निधी अनुक्रमे राहुल बबन कांबळे, अष्टविनायक ट्रेडर्स व विश्वकर्मा अ‍ॅल्युमिनियम तथा मंगेश व रवींद्र गोरखनाथ या नावाच्या खात्यांवर वळविले, यामुळे धामोडे ग्रामपंचायतीची लाखोंची फसवणूक झाली असून, सदरची फिर्याद विद्यमान ग्रामसेवक भगवान बाबासाहेब गायके यांनी येवला तालुका पोलिसांत दिली. येवला तालुका पोलिसांनी गुन्हा नोंद करून संशयित आरोपी मंगेश तानाजी भड यास अटक केली असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे हे करीत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतCorruptionभ्रष्टाचार