शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही स्थलांतराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:43 IST

सिडको : येथील सिडको प्रशासकीय कार्यालय येत्या १ आॅगस्टपासून बंद करण्याच्या निर्णयामुळे सिडकोतील नागरिकांनी त्यास विरोध केला असून, आमदार सीमा हिरे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : येथील सिडको प्रशासकीय कार्यालय येत्या १ आॅगस्टपासून बंद करण्याच्या निर्णयामुळे सिडकोतील नागरिकांनी त्यास विरोध केला असून, आमदार सीमा हिरे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी सदर कार्यालयाला तुर्तास स्थगिती देण्यात यावी, असा शेरा आमदार हिरे यांच्या पत्रावर मारला होता. असे असले तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यालय स्थलांतराच्या स्थगितीबाबत कार्यालयाशी कोणताच पत्रव्यवहार नसल्याचे कारण पुढे करीत सिडको प्रशासनाने शुक्रवारी नाशिकमधील सिडको कार्यालयातील कागदपत्रे आणि इतर साहित्य औरंगाबादला नेण्याची कारवाई सुरू केली होती. सदर बाब नागरिक संघर्ष समितीला समजल्यानंतर त्यास तीव्र विरोध केला. कार्यालयात आलेल्यांनीदेखील विरोध दर्शविला. आमदार सीमा हिरे यांनी तातडीने मुख्य प्रशासक भूषण गगरानी यांच्याशी संपर्क साधत नाशिक कार्यालयातील कागदपत्रे हलविली जात असल्याच्या त्यांच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय नाशिक सिडको कार्यालयाला स्थगितीचे आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचेही त्यांना सांगितले. त्यानंतर गगरानी यांनी नाशिक सिडकोचे प्रशासक कांचन बोधले यांना तातडीने कारवाई स्थगित करण्याचे सांगत गाडीत ठेवलेली कागदपत्रे पुन्हा उतरवून घेण्याच्या सूचना केल्या. समितीच्या प्रयत्नानंतर स्थलांतराचा प्रयत्न फसला असला तरी ही कारवाई तात्पुरती थांबविण्यात आली की कायमची, याची मात्र कोणतीही शाश्वती नसल्याने स्थलांतराची टांगती तलवार कायम आहे. याप्रसंगी नागरिक संघर्ष समितीचे गणेश पवार, धनंजय बुचडे, माणिक जायभावे, विश्वास अरिंगळे, अमोल सोनार, जावेद शेख, योगेश सोनगिरे, राजेंद्र खानकरी, प्रेमानंद जेधे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.