शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मेस्सीचा जलवा तर मुसाचीही झलक; शकीरीचीही हॅट्ट्रिक

By admin | Updated: June 27, 2014 00:12 IST

मेस्सीचा जलवा तर मुसाचीही झलक; शकीरीचीही हॅट्ट्रिक

आनंद खरेमेस्सीच्या दोन जोरदार गोलला नायजेरियाच्या मुस्सानेही दोन गोल करत चांगले प्रत्युत्तर दिले, तर शकीरीच्या हॅट्िट्रकमुळे स्विर्त्झलँडचा १६ तर प्रवेश करता आला.२० व्या विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच सर्वांचे लक्ष असलेल्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने आपल्या साखळीतील तिसऱ्या सामन्यातही २ गोल करत अर्जेंटिनाला या विश्वचषकामध्ये निर्भेळ यश मिळवून दिले. या दोन गोलमुळे गोल्डन बुटाच्या शर्यतीत त्याने ४ गोलसह ब्राझीलचा आपला बार्सिलोना संघ सहकारी ब्राझीलचा नेयमारशी बरोबरी करत आघाडी घेतली आहे. प्रत्येक सामन्यात गोल करणारा तो एकमेव खेळाडूही ठरला आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण खेळामुळे अर्जेंटिनाला आपल्या गटातील तीनही सामने जिंकता आले आणि नेदरलॅन्डनंतर अर्जेंटिनाच्या नावावर ९ गुणांची नोंद करता आली आहे. इ आणि एफ या दोन गटांचे शेवटचे चार सामने पार पडले आणि बाद फेरीच्या उपउपांत्यपूर्व सामन्याच्या ८ सामन्यांपैकी सहा सामन्यांचे चित्र स्पष्ट झाले. या सामन्यांच्या निकालानंतर आता १ जुलै रोजी होणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा सामना इ गटात दुसऱ्या क्रमांकाने बाद फेरीत प्रवेश करणाऱ्या स्विर्त्झलँडशी होईल, तर याच गटातील फ्रान्सला आपल्या अंतिम सामन्यात इक्वाडोरविरुद्ध बरोबरी पत्कारावी लागली असली तरीही दोन विजय आणि एक बरोबरीमुळे त्याचे पहिला क्रमांक राखला. तर नायजेरियाला आपल्या शेवटच्या सामन्यात अर्जेंटिनाकडून ३-२ अशी हार पत्कारावी लागली असली तरी इ गटात त्याला दुसरे स्थान मिळाल्यामुळे त्याचाही बाद फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. आता ३० जूनला फ्रान्स आणि नायजेरिया यांच्यामध्ये उपउपांत्यपूर्व लढत होईल. काल झालेल्या अर्जेंटिना- नायजेरिया या सामन्याचा विचार करता या सामन्याआधीच अर्जेंटिनाचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झालेला होता, तर नायजेरियाला बरोबरी आवश्यक होती कारण याच गटात इराणही शर्यतीत होता. मात्र बोस्नियाने इराणला ३-१ असे पराभूत केल्यामुळे नायजेरियाचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित होऊ शकला. परंतु हे घडत असताना नायजेरियाला त्याची कल्पना नव्हती कारण हे दोन्हीही सामने एकाच वेळी सुरू होते आणि केवळ यासाठीच प्रत्येक गटाचे शेवटचे होणारे दोन सामने एकाच वेळी का ठेवले जातात याचे कारणही स्पष्ट झाले आणि त्यामुळेच जर-तरवर अवलंबून न रहाता प्रत्येकाला शेवटचा सामना चुरशीनेच खेळावा लागतो. याचा प्रत्यय अर्जेंटिना- नायजेरिया या सामन्यात आला. खेळ सुरू झाल्यानंतर चारच मिनिटांत दोन अत्यंत सुरेख गोलांची नोंद झाली. अर्जेंटिनाच्या अ‍ॅगल डि मारियाने डावीकडून मुसंडी मारत थेट जोराने गोलकडे किक लगावली, मात्र चेंडू बारला लागून परत आला आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तोच मेस्सीने हा रिबाउंडचा चेंडू आपल्या डाव्या पायाने इतका जोरदार मारला की सर्वांना भेदून चेंडू जाळीत गेला आणि अर्जेंटिनाला तिसऱ्याच मिनिटाला आघाडी मिळाली. परंतु पुढच्या मिनिटालाच प्रतिआक्रमणात नायजेरियाचा स्टायकर अहमद मुस्सानेही डाव्या बाजूने मुसंडी मारत चेंडू डी पर्यंत नेला आणि तशीच जोरदार किक मारत गोल करून चौथ्या मिनिटात बरोबरी साधली. त्यानंतर मेस्सी, मारीया, सर्जिओ अग्येरो यांनी वारंवार चढाया करून गोल करण्याचे प्रयत्न केले. पूर्वार्धाच्या आधी अर्जेंटिनाला गोलसमोर फ्रि किक मिळाली. मेस्सीने लगावलेली ही क्व्हिंग फ्रि किक केव्हा आपल्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात जाऊन बसली हे नायजेरियाच्या गोलीला कळलेच नाही. ही किक बघितल्यानंतर या मेस्सीला इतकी का लोकप्रियता मिळालेली आहे याचीही प्रचीती आली. आणि त्याचा अप्रतिम दर्जा सिद्ध झाला. उत्तरार्धात सुरुवातीलाचा नायजेरियाच्या अहमद मुस्साने पुन्हा डी च्या थोडेसे मागे चेंडू मिळाला. दोन बचावपटूंना न जुमानता मुस्साने चेंडू पुढे नेत गोलीलाही चकवत उजव्या कोपऱ्यात चेंडू तटवून गोल करत पुन्हा बरोबरी साधून दिली आणि आपलाही दर्जा दाखवून दिला. त्यानंतरही अर्जेंटिनाचे हल्ले सुरूच होते. यामुळे मिळालेल्या कार्नरच्या चेंडूचा अचूक अंदाज घेत अर्जेंटिनाच्या मार्कोस रोजोन चेंडूला आपल्या पायाने योग्य दिशा देत गोल करत अर्जेंटिनाला पुन्हा आघाडीवर नेले. या आघाडीनंतर शेवटची २० मिनिटे राहिली असताना अर्जेंटिनाचे प्रशिक्षक अलेझा्राड्रो सेबेला यांनी मेस्सीला विश्रांती देत आपली कल्पकता दाखवत त्याला पुढील सामन्याआधी काही दुखापत होऊ नये याची काळजी घेतली. मेस्सी पूर्णवेळ खेळला असता तर आणखी एखादा गोल करू शकला असता आणि त्याच्या नावावर हॅट्ट्रिकसह सर्वात जास्त गोलचीही नोंद झाली असती. मात्र वैयक्तिक रेकॉर्डपेक्षा संघाचे हित महत्त्वाचे आहे याचा प्रत्यय यामधून दिसला. मेस्सीला बाहेर काढल्यामुळे नायजेरियाने मोकळा श्वास सोडला आणि आपली आक्रमणे तेज करण्याची संधी त्यांना मिळाली. यावरूनही फुटबॉल हा सांघिक खेळ असला तरी एका खेळाडूमुळे किती फरक पडू शकतो याचाही पुन्हा एकदा प्रत्यय आला. याच गटातील इराण-बोस्निया-हर्जीगोव्हिना या सामन्यात बोस्नियाने इराणवर हल्लाच चढवत ३ गोल डागले. बोस्नियाने अर्जेंटिनाबरोबरच्या सामन्यातही चांगला खेळ केला होता. त्यावरून विश्वचषकात पदार्पण करणारा हा संघ सरप्राईज पॅकेज ठरेल असेच वाटत होते. मात्र नायजेरियाविरुद्धचा पराभव त्यांना महागात पडला आणि बोस्नियाला साखळीतच बाद व्हावे लागले. मात्र त्याच नायजेरियाचा बोस्नियाच्या इराणविरुद्धच्या या विजयामुळे फायदा झाला हे नक्कीच. इ. गटातील दोन लढतींपैकी फ्रान्स-इक्वाडोर हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्याआधीच दोन विजयामुळे ६ गुणांच्या आधारे फ्रान्सचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित झालेलाच होता, मात्र गटात पहिल्या क्रमांकासाठी त्याला विजयाची आवश्यकता होती. फ्रान्सचा पहिल्या दोन सामन्यांतील जलवा मात्र या सामन्यात दिसला नाही. त्यांच्या करीम बेंझीमा, पोग्बा यांनी काही काही चांगले प्रयास केले, मात्र कोंडी फुटली नाही. आणि १-१ गुणावर दोन्हीही संघांना समाधान मानावे लागले. या १ गुणामुळे फ्रान्सला ७ गुणांसह पहिला क्रमांक मिळवता आला. मात्र या गटातील दुसऱ्या सामन्यात स्विर्त्झलँडने निर्विवाद विजय मिळविल्यामुळे इक्वाडोअरला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. स्विर्त्झलँडच्या एक्सर्डेन शकीरीने १-२ नाही तर चक्क हॅट््ट्रिक करत स्विर्त्झलँडची नौका पार केली. कारण या सामन्यात बरोबरी जरी झाली असती तर स्विर्त्झलँड आणि इक्वाडोरचे ४-४ असे समान गुण झाले असते. अशा वेळी इक्वाडोर सरस गोल सरासरीच्या आधारे पुढे गेला असता. त्यामुळेच प्रत्येक गटाचे शेवटचे दोन सामने एकाच वेळी का खेळवले जातात ते याचसाठी. आता शेवटच्या चार सामन्यांनंतर साखळीतील हिशोब संपतील आणि बाद फेरीचा खरा थरार २८ जूनपासून बघायला मिळेल. याचा पहिलाच थरार यजमान ब्राझील आणि चिली या दोन लॅटिन अमेरिकेच्या संघात बघायला मिळेल.