शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

पंचाहत्तरीतही मर्चंट दाम्पत्यांची रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST

सोयगाव : कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्र जास्त चर्चेत राहिले. अनेकांचे प्राण वाचल्याने डॉक्टर्स हे देवदूत भासले तर अनेक ठिकाणी डॉक्टरांवर ...

सोयगाव : कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्र जास्त चर्चेत राहिले. अनेकांचे प्राण वाचल्याने डॉक्टर्स हे देवदूत भासले तर अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होण्याच्याही घटना घडल्या. काही लोकांनी वैद्यकीय क्षेत्र बदनाम केले, तर काही लोकांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. मालेगावमधील डाॅक्टर दाम्पत्य अनिल व सौ. रिता मर्चंट यांनीदेखील मालेगावमध्ये कोरोनाकाळात बजावलेली रुग्णसेवा उल्लेखनीय ठरली.

अतिशय उदात्त अशा या पेशाला जरी काही लोक फक्त पैसे कमावण्याचे साधन म्हणून बघत असतील. पण काही चांगल्या लोकांमुळे या पेशाचे पावित्र्य टिकून आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीने वागणारे काही डॉक्टर समाजात आहेत. त्यामुळे समाजाचा या क्षेत्रावर विश्वास टिकून आहे. असेच मालेगावातील एक डॉक्टर दाम्पत्य डॉ. अनिल व रिता मर्चंट यांची नावे घ्यावी लागतील. हे दाम्पत्य वयाच्या पंचाहत्तरीतसुद्धा मनोभावे रुग्णसेवा करते आहे. कोरोनाकाळातदेखील स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अगोदर रुग्णसेवा हेच ब्रीद घेऊन त्यांनी अनेक रुग्णांना सेवा दिली. मर्चंट मालेगावातील अतिशय जुने व अनुभवी डॉक्टर असून, पंचक्रोशीत त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे ते परिचित आहेत. डॉक्टर अनिल हे जुन्या काळातील एमबीबीएस असून, अतिशय माफक दरात रुग्णसेवा देतात. त्यांनी ठरवले असते तर खोऱ्याने पैसा कमावला असता; पण त्यांच्या तत्त्वात ते कधी बसलेच नाही. रुग्ण किती गंभीर असो पण गरज असेल तरच इतर चाचण्या करणार. उगाच आला पेशंट म्हणून विनाकारण रक्त चाचण्या, इतर चाचण्या करून पैसा कमावणे हे त्यांनी कधीच धोरण अवलंबले नाही. कोरोनाकाळातदेखील त्यांनी सेवा अखंडितपणे चालू ठेवली. कोणी रुग्ण बाहेरगावी असेल अथवा येणे शक्य नसेल तर फोनवरसुद्धा त्याचा इलाज करतात. योग्य ते औषध स्वतः मेडिकल दुकानदाराशी बोलून द्यायला सांगतात.

डॉ. रिता मर्चंट यांचीदेखील समर्थ साथ असते. आलेली वृद्ध महिला असो तरुणी, प्रेमाने विचारपूस करून इलाज करणार. धीर देणार. विशेष म्हणजे तुमच्याकडे फी देण्यासाठी पैसे असो नसो डॉ. दाम्पत्य तुमच्यावर इलाज करणारच.

डॉ. अनिल व रिता मर्चंट यांचा दवाखाना मालेगाव कॅम्प येथे असला तरी पेशंट हे सर्व मालेगावातून येत असतात शिवाय आजूबाजूच्या खेड्यातीलदेखील रुग्ण येथेच येतात. डॉक्टर अनिल मर्चंट यांनी रोटरी क्लब मालेगावचे अध्यक्षपद भूषवले आहे. आज त्यांना वैद्यकीय सेवेचा ४० वर्षांचा अनुभव असून, भावी पिढीतील डॉक्टरांना ते प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला देतात.

- १० डॉ. अनिल मर्चंट १० डॉ. रिता मर्चंट

100921\2352445810nsk_29_10092021_13.jpg~100921\2352445810nsk_31_10092021_13.jpg

- १० डॉ. अनिल मर्चंट~१० डॉ. रिटा मर्चंट