नाशिक : महिला व बालविकास प्रकल्पांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मंजूर २६ पदांपैकी १५ पदे रिक्त असल्याने क्षेत्रीय कामकाजावर त्याचा मोठा परिणाम होऊन विभागाच्या कामकाजात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, तसेच देवळा व चांदवड तालुक्यांतील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवावी, अशी मागणी काल (दि.१२) महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे यांच्या उपस्थितीत महिला व बालकल्याण समितीची बैठक झाली. बैठकीत आरोग्यविषयक कामाचा व एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा आढावा घेतला असता जिल्'ातील बालकांचे लसीकरण काम ७५ टक्के पूर्ण झालेले असून, शालेय मुलांचे आरोग्य तपासणीचे काम ९५ टक्के झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांनी हे काम १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. बैठकीत सुकन्या योजनेची माहे एप्रिल ते डिसेंबर २०१४ पर्यंतच्या मुलींच्या जन्माच्या माहितीचे सर्वेक्षण करून सादर करण्याबाबत आदेश देण्यात आले.
रिक्त पदांमुळे कामकाजावर गंभीर परिणाम महिला व बालकल्याण समितीची बैठक
By admin | Updated: February 13, 2015 01:10 IST