शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पाथरेत केंद्रीय समितीची भेट

By admin | Updated: November 6, 2015 22:59 IST

पाथरेत केंद्रीय समितीची भेट

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द व पाथरे बुद्रुक या दोन्ही गावांत सर्वंकष सहभागी नियोजन प्रक्रिया योजनेंतर्गत केंद्रीय समितीने भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. या समितीत महात्मा गांधी नरेगाचे संचालक डी. के. सिंग, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे अर्थशास्त्र सल्लागार मनोरंजन कुमार, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी जी. एस. गाडीलकर यांचा समावेश होता. यावेळी सिंग यांनी बचतगटांच्या महिला व ग्रामस्थांशी संवाद साधला. सर्वंकष सहभागी नियोजन प्रक्रिया योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचे नियोजन करताना लोकसहभाग हा मूलभूत घटक म्हणून ओळख करून देणे असल्याचे सिंग यांनी सांगितले. ग्रामपंचायतमार्फत होणारे प्रत्येक काम ग्रामसभेपुढे ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. रोजगार हमी योजनेच्या जॉब कार्डच्या माध्यमातून लोकांना काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यातून मिळणारा पैसा थेट काम करणाऱ्याच्या बॅँक खात्यात जमा होणार असून, मागेल त्याला काम मिळणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. सिन्नर पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र घुमरे यांनी समितीचे आभार मानले. मनरेगाचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सिन्नरचे तहसीलदार मनोजकुमार खैरनार, दत्ता वायचळे, धनंजय जगताप, अरुण दातीर, ललिता डोंगरे, सुकदेव गुंजाळ, मच्छिंद्र चिने, सविता नरोडे, मीननाथ माळी, सुनीता वाणी, गोविंद मोरे, एस. जी. धालपे यांच्यासह तिन्ही गावांतील ग्रामपंचायत सदस्य, बचतगटांच्या महिला, मुख्याध्यापक, शिक्षक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)केंद्रीय समितीसह जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी पाथरे खुर्द व पाथरे बुद्रुक या दोन्ही गावांत पायी फिरून पाहणी केली. कृष्ण मंदिर व जय अंबामाता मंदिरात दोन्ही गावांचा रांगोळीने काढलेला नकाशा, वृक्ष लागवड व संवर्धन, अंतर्गत रस्ते कॉँक्रिटीकरण, ग्रामस्वच्छता, नियोजन, शेततळे यांना भेटी देऊन माहिती घेत समाधान व्यक्त केले.