शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचा दवाखाना ‘अत्यवस्थ’

By admin | Updated: July 15, 2016 00:54 IST

जुने सिडको : निधीअभावी रखडले काम; रुग्णांची गैरसोय

सिडको : जुने सिडको येथील महापालिकेच्या दवाखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून, खिडक्यांच्या काचादेखील फुटल्या आहेत. तसेच दवाखान्याच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. दवाखान्याची दुरवस्था झाली असून, संपूर्ण दवाखानाच अत्यवस्थ झाला आहे. निधीअभावी दवाखान्याचे काम रखडल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.जुने सिडको येथील मनपाच्या दवाखान्यात रुग्णांची गैरसोय होण्याबरोबरच स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. संपूर्ण दवाखान्यालाच घरघर लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. दवाखान्याची दुरुस्ती करावी, याबाबत प्रभागाच्या शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचाकडून पाठपुरावा सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वीदेखील नगरसेवक पांडे यांनी अधिकाऱ्यांसमवेत दवाखान्याची पाहणी करून नाराजी व्यक्त केली. जुने सिडको येथे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेचा दवाखाना सुरू आहे. या दवाखान्यात जुने सिडकोसह परिसरातील रुग्ण उपचार घेतात. येथे थंडी, ताप, खोकला, लसीकरण, गरोदर माता तपासणी यांसह इतर आजारांवर उपचार केले जातात. या दवाखान्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली असून, याकडे महापालिका लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळते. या दवाखान्याचा संपूर्ण परिसर घाण, कचरा तसेच गाजर गवताने वेढलेला आहे. दवाखान्याच्या सर्व खोल्या खराब झाल्या असून, भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे संपूर्ण परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या दवाखान्यात गरोदर मातांच्या तपासणीसाठी टेबलच नाही. अशीच परिस्थिती इतर रुग्णांच्या बाबतीत आहे. रुग्णांसाठी गोळ्या, औषधेही पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने रुग्णांना देण्यात येणारी औषधे खालीच ठेवण्यात आलेली आहेत. नगरसेवक पांडे यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, यामुळे पांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. पिण्याचे पाणी तर नाहीच, परंतु येथे असलेल्या शौचालयाचीही दयनीय अवस्था झाली आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दवाखान्यात सुरक्षा रक्षकदेखील नाही. (वार्ताहर)