शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदाची निवडणूक बिनविरोध?

By admin | Updated: March 5, 2017 01:36 IST

नाशिक : नाशिकमध्ये शिवसेनेकडून भाजपाविरुद्ध उमेदवार न देता महापौराची निवड बिनविरोध केली जाण्याची शक्यता वाढली आहे.

 नाशिक : मुंबई महापालिकेत भाजपाने महापौरपदासह कोणत्याही समित्यांची निवडणूक न लढवता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा आणि विरोधी पक्षात न बसण्याचा निर्णय जाहीर केल्याने नाशिकमध्ये शिवसेनेकडून भाजपाविरुद्ध उमेदवार न देता महापौराची निवड बिनविरोध केली जाण्याची शक्यता वाढली आहे. मुंबईबरोबरच नाशिकमध्येही सेना-भाजपा एकत्र येऊन पुढील पाच वर्षे एकत्रित संसार करणार काय, याबाबत सेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. मुंबईत भाजपाने शिवसेनेला मिळालेला कौल मान्य करत पूर्ण समर्थन देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय, कोणत्याही समित्यांची निवडणूक न लढविण्याचेही ठरविले आहे. मात्र, पारदर्शकतेच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेण्याचाही इशारा देऊन ठेवला आहे. मुंबईत सेना-भाजपा एकत्र राहणार असल्याने त्याचे पडसाद नाशिकमध्ये काय उमटतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. नाशिकमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत आहे. भाजपाने ६६ तर शिवसेनेला ३५ जागा मिळाल्या आहेत. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष व रिपाइं मिळून संख्या २१ वर जाते. नाशकात भाजपाचाच महापौर-उपमहापौर होणार हे निश्चित आहे, परंतु महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आता शिवसेना स्वतंत्र उमेदवार उभा करणार की बिनविरोध निवडीसाठी हातभार लावणार, याबाबत सेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून असणार आहे. येत्या १४ मार्च रोजी महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. यंदा अनुसूचित जमातीसाठी महापौरपद आरक्षित असल्याने भाजपाकडून ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांचे नाव सर्वात अग्रभागी आहे. भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने आता विरोधासाठी विरोध न करता उमेदवारच न देण्याचा निर्णय सेनेकडून होण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी-कॉँग्रेस व मनसे यांच्याही भूमिकेवर बिनविरोध निवड अवलंबून असणार आहे. (प्रतिनिधी)