शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

नऊ नगरसेवकांमधून ठरणार महापौर

By admin | Updated: February 4, 2017 23:18 IST

कुणाची लागणार लॉटरी? : अनुसूचित जमातीसाठी आरक्षण

नाशिक : नाशिक महापालिकेचे महापौरपद यंदा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने आगामी अडीच वर्षांसाठी अवघ्या नऊ नगरसेवकांमधून महापौर निश्चित होणार आहे. नऊ नगरसेवकांपैकी पाच महिला असणार आहेत. महापालिका निवडणुकीत कुणाची सत्ता प्रस्थापित होते, यानुसार संबंधित अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागेवरून निवडून येणाऱ्या नगरसेवकाच्या भाग्याचा फैसला होणार आहे. राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदासाठी शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात नाशिकचे महापौरपद पुढील  अडीच वर्षांकरिता अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे.  महापालिकेत ९ जागा या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. त्यात पाच जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे महापालिकेचा महापौर हा प्रभाग १, २, ४, ६, ८, ११, १६, २३ आणि २७ या नऊ प्रभागांमधीलच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपाने अनुसूचित जमाती या आरक्षित जागांसाठी नगरसेवक रंजना भानसी, राष्ट्रवादीतून भाजपात आलेले सुरेश खेताडे, प्रा. सरिता सोनवणे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, मनसेतून भाजपात दाखल झालेल्या नगरसेवक रेखा बेंडकुळे, वनिता लहारे, रुपाली थविल, रुपाली निकुळे व लता पवार यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेने, मनसेचे नगरसेवक व शिक्षण उपसभापती गणेश चव्हाण यांच्या पत्नी जयश्री चव्हाण, सिद्धेश्वर अंडे, वर्षा गिते, भाजपातून सेनेत गेलेले माजी नगरसेवक परशराम वाघेरे, राधा बेंडकुळे, माजी नगरसेवक सुभाष गुंबाडे, माकपातून सेनेत गेलेल्या नगरसेवक नंदिनी जाधव, रुपाली गांगुर्डे व चंद्रकांत खोडे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून या जागांवर राजश्री जाधव, कविता आव्हाड, लक्ष्मण म्हसे, अमोल काथे, कॉँग्रेसकडून सुरेखा बदादे, ऋषिकेश फुलकर, वैशाली गवळी, शोभा भोये व आशा तडवी तर मनसेकडून जयश्री पवार, विशाल कोळी, मंदा अढाणे, भाजपाचे माजी नगरसेवक जगन्नाथ तांदळे यांच्या पत्नी चित्रा तांदळे, योगेश शेवरे, हेमलता कडाळे, माजी नगरसेवक रंजना जोशी व लक्ष्मण वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे, या उमेदवारांमधून जे नऊ नगरसेवक विजयी होतील, त्यातील एकाच्या गळ्यात थेट महापौरपदाची माळ गळ्यात पडणार आहे. परिणामी, या नऊ प्रभागातील लढती या लक्षवेधी व महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. (प्रतिनिधी)सेना - भाजपात रस्सीखेचमहापालिकेत स्वबळावर भाजपाचे कमळ फुलले तर भाजपाकडून आतापर्यंत चारवेळा निवडून गेलेल्या ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांचे नाव आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. भानसी यांना आजवर पक्षाकडून स्थायी समिती सदस्यत्व वगळता कोणतेही महत्त्वाचे पद मिळालेले नाही. त्या खालोखाल प्रा. सरिता सोनवणे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे आणि रुपाली निकुळे यांचीही दावेदारी राहू शकते, तर सेनेकडून माजी नगरसेवक सुभाष गुंबाडे, परशराम वाघेरे, जयश्री चव्हाण आणि नंदिनी जाधव हे उमेदवार शर्यतीत राहतील. कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मनसेने आघाडी केल्यास त्यांच्याकडून चित्रा तांदळे, आशा तडवी, रुपाली गांगुर्डे ही नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात त्यासाठी त्यांना अगोदर नगरसेवक म्हणून निवडून यावे लागणार आहे.