शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST

नाशिक : कोरोनाकाळात मास्कचा वापर वाढला असून, मास्कच्या वापरातही काही नागरिक संरक्षण किंवा सुरक्षिततेपेक्षा दिखाव्यालाच अधिक महत्त्व देत ...

नाशिक : कोरोनाकाळात मास्कचा वापर वाढला असून, मास्कच्या वापरातही काही नागरिक संरक्षण किंवा सुरक्षिततेपेक्षा दिखाव्यालाच अधिक महत्त्व देत आहेत. त्यामुळे ज्यांच्या मास्कचे कापड त्वचेसाठी अपायकारक असते, अशा नागरिकांना त्वचेसंदर्भातील आजार भेडसावत आहेत. त्यामुळे मास्क वापरताना तो एन ९५ असावा किंवा त्याचे कापड हे कॉटनचे असावे किंवा सर्जिकल मास्कच वापरण्याची गरज असल्याचे, अशा घटनांनी अधोरेखित केले आहे.

तोंडावर सातत्याने मास्क राहत असल्याने त्वचेला घाम सुटत असून मास्कचे कापड अयोग्य असल्यास तसेच घाम पुसला न गेल्यास त्यामुळे त्वचारोग उद्भवू शकतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य मास्कचा वापर करावा तसेच सॅनिटायझरचासुद्धा अतिरिक्त प्रमाणात वापर करू नये. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळेही त्वचारोग होण्याची दाट शक्यता असते. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते. अल्कोहोलमुळे हाताचा ओलावा शोषून घेतला जात हात कोरडे होतात. यामुळे हाताला भेगाही पडण्याची शक्यता असते. तसेच सॅनिटायझर लावल्यानंतर कुठल्याही ज्वलनशील पदार्थाला स्पर्श करू नये, हात भाजण्याची शक्यता असते. सॅनिटायझरपेक्षा साबण, पाण्याने हात धुणे अधिक योग्य ठरते.

१) मास्क आवश्यकच; पण असे करा रक्षण !

डिस्पोझेबल मास्कचा पुन्हा पुन्हा वापर करू नये. साधा मास्क असल्यास त्याचे कापड कॉटनचेच असणे सोयीस्कर ठरते. कापडी मास्क स्वच्छ व जंतूविरहित असेल, याची खात्री करून घ्यावी. एकच मास्क सलग दोन-तीन दिवस वापरू नये. कापडी मास्क स्वच्छ व जंतूविरहित असेल, याची खात्री करून घ्यावी. सतत मास्कला हात लावू नये. त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो व त्वचेसंबंधित आजार होऊ शकतो.

-----

सॅनिटायझरपेक्षा साबण बरे

सॅनिटायझर वारंवार वापरल्याने हाताला खाज सुटते. हे टाळण्यासाठी घरी हात धुण्यासाठी साबणाचा वापर करणे अधिक योग्य ठरते. सतत सॅनिटायझरचा वापर टाळावा. शक्यतोवर हात साबण लावून पाण्याने धुवावे. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे त्वचारोग होऊ शकतो.

------

त्वचाविकाराचे रुग्ण वाढले

मास्कचा सातत्याने वापर केल्याने त्वचा रोग उद्भवतो. असे आढळून आल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व निदान करून घ्यावे. मास्कचा वापर करताना तो योग्य गुणवत्तेचा आहे ना, त्याची खात्री करूनच तो वापरण्यात यावा.

-----

कोरोनापासून बचावासाठी शक्यतो एन-९५ मास्क वापरावा. मास्कच्या वापरामुळे त्वचेवर पुरळ आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. परस्पर मेडिकलमध्ये जाऊन औषधोपचार करून घेणे टाळावे.

------------