शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचे आठवडाभरात २५ लाखांचे उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन जिल्हाभरातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. भाजीपाला खरेदी आणि विक्रीच्या माध्यमातून दिवसभरात सहा ते ...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन जिल्हाभरातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. भाजीपाला खरेदी आणि विक्रीच्या माध्यमातून दिवसभरात सहा ते सात कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यातच भाजीपाला आवक घटल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाजार समिती बंद केल्याने दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शिवाय बाजार समितीला मिळणारे उत्पन्नदेखील बुडत आहे. खरेदी-विक्रीच्या माध्यमातून बाजार समितीला बाजार शुल्कातून सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न रोज अपेक्षित असते. मात्र, आठवडाभरापासून बाजार समिती बंद असल्याने साधारणपणे पंचवीस लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

इन्फो===

शेतकऱ्यांना आर्थिक फटका

जिल्हा प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी थेट बाजार समिती बंद केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. कोरोना नियमांचे पालन करीत नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाला साकडे घातले होते. मात्र, परवानगी मिळाली नाही. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिवाय शेतमाल खराब होत असल्याने तो फेकून देण्याची वेळ आली आहे.