शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जागतिकीकरणात मराठी व्हावी ज्ञानभाषा

By admin | Updated: January 11, 2015 00:32 IST

वाचक दिन : ‘जागतिकीकरण, भाषा आणि साहित्य’ परिसंवादातील सूर

नाशिक : इंग्रजी ही ‘किलर लॅँग्वेज’ नाही. ती तिच्या कर्तृत्वाने पुढे आली आहे. मराठीच्या नावाने गळे काढणारी मंडळी मराठी भाषेच्या समृद्धीसाठी काय प्रयत्न करतात, असा सवाल उपस्थित करीत मराठी ही येत्या काळात ज्ञानभाषा न झाल्यास तिची गतही अन्य भाषांप्रमाणेच होईल, असा सूर परिसंवादात निघाला. ग्रंथाली प्रकाशन व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथाली’च्या वाचक दिनानिमित्त ‘जागतिकीकरण, भाषा आणि साहित्य’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकात करण्यात आले होते. परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार, लेखक अरुण साधू, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर, ज्येष्ठ लेखक रमेश पानसे, संगीतकार कौशल इनामदार, दीपक घारे, श्रुती आवटे आदिंनी मते मांडली. यावेळी बारावीची विद्यार्थिनी व ‘लॉगआउट’ पुस्तकाची लेखिका आवटे म्हणाली की, आमच्या पिढीला जागतिकीकरणात झालेल्या बदलाचा अनुभव नाही. आम्ही भावनावश न होता व्यक्त होतो. तरुणांनी आपण जे अनुभवतो ते लिहायला हवे. हे लिखाण बाजारात आल्यास इंग्रजी पुस्तकेही मागे पडतील. ज्येष्ठ चित्रकार बहुळकर यांनी देशावरील परकीय आक्रमणांचा इतिहास मांडत संस्कृतीची सरमिसळ व त्यातून भाषेवर झालेले परिणाम यावर प्रकाश टाकला. आमदार हेमंत टकले यांनीही या विषयावर मत मांडले. ते म्हणाले, लहान मुलांतील मराठी भाषेत विचार करण्याची विचार करण्याची प्रवृत्ती संपत चालली आहे. ती ‘कॉमिक्स’ वाचतात. त्यामुळे मराठीचे भवितव्य अवघड बनले आहे. वीणा सानेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ‘शब्द रुची’ मासिकाच्या ‘भाषा आणि साहित्य’ विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आली. (प्रतिनिधी)