शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगार कुंदन परदेशीसह १७ जणांवर मोक्का

By admin | Updated: July 8, 2016 21:00 IST

शहरात गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढलेल्या कारवाया व आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या

नाशिक : शहरात गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढलेल्या कारवाया व आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे़ याचाच एक भाग म्हणून पंचवटीतील सराईत गुन्हेगार कुंदन परदेशीसह त्याच्या १७ साथीदारांवर पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कायद्यान्वये (मोक्का) शुक्रवारी (दि़८) कारवाई केली आहे़ पोलीस आयुक्तांनी यापूर्वी सिडकोतील टिप्पर गँग, पंचवटीतील राकेश कोष्टी गँगवर मोक्कान्वये कारवाई केली आहे़, तर या कायद्यान्वये कारवाई करण्यात येणारी शहरातील ही तिसरी गुन्हेगारी टोळी आहे़ या कायद्यान्वये सराईत गुन्हेगार कुंदन सुरेश परदेशी, मयूर शिवराम कानडे, मयूर गोपाल भावसार, आकाश विलास जाधव, अजय जेठा बोरिसा, अक्षय कैलास इंगळे, प्रवीण भारत राजपूत, रवींद्र दगडूसिंग परदेशी, अर्जुन परदेशी, गणेश भास्कर कालेकर, राकेश तुकाराम कोष्टी, व्यंकटेश नानासाहेब मोरे, किरण दिनेश नागरे, करण रवींद्र परदेशी, जयेश हिरामण दिवे यांचा समावेश आहे़ सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी व त्याच्या साथीदारांवर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, जबरी लूट, मारहाण, अपहरण, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत़ २७ मे रोजी जुन्या भांडणाची कुरापत काढून परदेशी व त्याच्या १७ साथीदारांनी पंचवटीतील हनुमानवाडी कॉर्नरवरील भेळभत्ताविक्रेता सुनील रामदास वाघ याचा खून, तर त्याचा भाऊ हेमंत वाघ यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता़ याप्रकरणी परदेशीसह त्याच्या साथीदारांवर पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हादेखील दाखल आहे़ पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन, पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, विजय पाटील, सहायक पोलीस आयुक्तसचिन गोरे, विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर, पोलीस उपनिरीक्षक व्ही़ एस़ जोनवाल व पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली़ शहरातील बहुतांशी गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख म्होरके व त्यांचे साथीदार या कायद्यान्वये किमान सहा महिने मध्यवर्ती कारागृहात जेरबंद असल्याने नाशिककरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे़. गुन्हेगारांच्या पाठीराख्यांवर नजरशहरातील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांना राजकीय आश्रय असून, त्यांच्याकडून आर्थिक व कायदेशीर मदत केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे़ त्यानुसार या गुन्हेगारांना सहाय्य करणारे राजकीय पदाधिकारी तसेच नागरिकांवर करडी नजर ठेवली जाणार आहे़