शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मानोरी : सातारे येथे एक एकरातील पिकाचा प्लॉट उपटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 19:23 IST

मानोरी : येवला तालुक्यातील सातारे येथील शेतकरी वाल्मिक शेळके यांचा १ एकर टोमॅटोचा प्लॉट महिना भरापूर्वी लागवड केलेला असताना त्यावर करप्या नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो भस्मसात झाल्याने शेळके यांनी टोमॅटो प्लॉट उपटुन फेकला असून शेळके यांना सुमारे ६० हजाराचा तोटा सहन करावा लागला असून झाडाला टोमॅटो सुद्धा बघायला मिळाले नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

ठळक मुद्देसुमारे ६० हजाराचा तोटा सहन करावा लागला

मानोरी : येवला तालुक्यातील सातारे येथील शेतकरी वाल्मिक शेळके यांचा १ एकर टोमॅटोचा प्लॉट महिना भरापूर्वी लागवड केलेला असताना त्यावर करप्या नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टोमॅटो भस्मसात झाल्याने शेळके यांनी टोमॅटो प्लॉट उपटुन फेकला असून शेळके यांना सुमारे ६० हजाराचा तोटा सहन करावा लागला असून झाडाला टोमॅटो सुद्धा बघायला मिळाले नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.महाराष्ट्र शासनाने तात्काळ पाऊल उचलून मक्यावरील लष्करी अळीने व करप्या नावाच्या रोगाने जे पिके उदध्वत झाले. असेल तेथे तात्काळ जावुन पाहाणी करून पंचनामा करून भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी करत आहे. गेल्या पाच महिन्यापासून दुष्काळाच्या यातना सहन करत आहे. या भागात जून महिन्याच्या सुरु वातीलाच मान्सून पूर्व अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर बळीराजा तात्पुरता सुखावला असून या मान्सून पूर्व पावसाच्या जोरावर येवला तालुक्यातील पश्चिमेकडील धुळगांव, दहेगांव, सातारे, शेवगे, पिंपळगाव लेप, जऊळके, मानोरी, देशमाने, मुखेड फाटा आदी भागातील शेतकरी वर्ग टोमॅटो पिकाची गेल्या महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात व्यस्त झाल्याचे दिसून येत होते.मात्र आता करप्या नावाच्या रोगाने झडप घातल्याने शेतकरी वर्ग हा कर्जाच्या खाहीत लोटला जात आहे. आधीच मक्यावरील लष्करी अळीच्या संकटात असतांना लगेच टोमॅटोवर करप्या रोग आल्याने शेतकरी बांधवांना सातत्याने औषध फवारणी करावी लागत असून शेतकरी हतबल झाला आहे. यावेळी वाल्मिक शेळके, गणपत शेळके, सचिन शेळके, माऊली गचाले आदी उपस्थित होते.सध्या सर्वत्र लष्करी अळीने थैमान घातले असून मका पाठोपाठ टोमॅटो देखील कारपण्यास सुरु वात झाली आहे. मी मिहनाभरापूर्वी माङया शेतात टोमॅटोची लागवड केली होती. त्यासाठी मला साधारण ६२ हजार रु पयांच्या आसपास खर्च झाला असून मला टोमॅटो लागवडीत झाडाला एक टोमॅटो देखील बघायला मिळाले नसून सर्व खर्च पाण्यात गेला असून कर्जबाजारी होण्याची वेळ माङयावर आली आहे.- वाल्मिक शेळके, शेतकरी, सातारे, ता.येवला.