शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड आगाराला पांडुरंंग ‘पावला’!

By admin | Updated: August 3, 2015 22:50 IST

आषाढी वारी : पंढरपूर फेऱ्यांमधून पावणेसात लाखांचे उत्पन्न

मनमाड : तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठलाच्या भेटीसाठी आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त एस. टी. महामंडळाच्या मनमाड आगाराने भाविकांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या विशेष बससेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला. सात दिवस सुरू असलेल्या या विशेष पंढरपूर फेऱ्यांमधून आगाराला तब्बल पावणेसात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याने मनमाड आगाराला पांडुरंग पावला आहे.रेल्वेचे जंक्शन व मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मनमाड बसस्थानकावर प्रवाशांची होणारी गर्दी पाहता मनमाड आगाराचे व्यवस्थापक दिलीप नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर यात्रेसाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. पसिरातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह अन्य ठिकाणाहून रेल्वेने मनमाड जंक्शन स्थानकावर आलेले प्रवाशी एस. टी. बसने पंढरपूरला जाणे पसंत करतात. ही बाब हेरून प्रवाशांना बससेवेकडे आकर्षित करण्यासाठी आगाराचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत होते. वेळोवेळी यात्रेसाठी सुटणाऱ्या गाड्यांबाबत उद्घोषणा कक्षावरून सतत माहिती देण्यात येत होेती. पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या बसफेऱ्यांची माहिती प्रवाशांना मिळावी यासाठी स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करण्यात आला होता. यात्रेसाठीच्या प्रवाशी वाढीचे उद्दिष्ट साध्य करण्यात आगाराला यश मिळाले.दि. २३ जुलै ते ३१ जुलै या कालावधीमध्ये आगाराच्या ११ बसेसने पंढरपूरच्या १२५ फेऱ्या केल्या. यामध्ये ७७२३ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या सर्व यात्रा फेऱ्यांमधून आगाराला सहा लाख ८९ हजार २९१ रुपयांचे उत्पन्न मनमाड आगाराला मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पंढरपूर प्रवाशांच्या संख्येत ९९२ ने, तर उत्पन्नामधे एक लाख ४० हजार रुपयांची वाढ झाली आहे. (वार्ताहर)