शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नायगावच्या सरपंचपदी मनीषा कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:25 IST

नायगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपला पॅनल व विरोधी गटाच्या ग्रामविकास पॅनलमध्ये झालेल्या रंगतदार लढतीत आपला पॅनलने ...

नायगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपला पॅनल व विरोधी गटाच्या ग्रामविकास पॅनलमध्ये झालेल्या रंगतदार लढतीत आपला पॅनलने १३ पैकी ८ जागा मिळवत आघाडी घेतली होती. गुरुवारी (दि.२५) सरपंच, उपसरपंचपदाची निवडप्रक्रिया राबविण्यात आली. त्यात सरपंचपदासाठी आपला पॅनलकडून मनीषा समाधान कदम, तर ग्रामविकास पॅनलकडून सुनीता शंकर पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर उपसरपंचपदासाठी आपला पॅनलचे भाऊसाहेब खंडेराव सांगळे यांना ग्रामविकास पॅनलच्या उत्तम दत्तात्रय पाबळे यांनी आव्हान दिले. चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर माघारीसाठी दिलेल्या मुदतीत कोणाही उमेदवाराने माघार न घेतल्याने सरळ लढत झाली. यात आपला पॅनलच्या मनीषा कदम (८) यांनी सुनीता पवार (५) यांचा पराभव करून सरपंचपदाला, तर भाऊसाहेब सांगळे (८) यांनी ग्रामविकासच्या उत्तम पाबळे (५) यांचा पराभव करून उपसरपंचपदाला गवसणी घातली. याप्रसंगी पॅनलचे नेते भाऊसाहेब लोहकरे, विष्णु पाबळे, अंबादास जेजूरकर, किरण घिया, राजेंद्र बैरागी, एकनाथ जारकड, सलीम शेख, अशोक लोहकरे, संतोष सहाणे आदींसह नवनिर्वाचित सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - २६ नायगाव सरपंच

सिन्नर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा कदम, तर उपसरपंचपदी भाऊसाहेब सांगळे विजयी झाल्या. त्याप्रसंगी जल्लोष करतांना ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते.