घोटी:राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटाची स्वयंपूर्ण प्रगतीची घोडदौड अभिमानास्पद आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांची उन्नती करणाº्या या बचत गटाला सन्मानित करतांना अभिमान वाटतो असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.बायफ मित्र संस्थेच्या वर्धापन दिन निमित्त राज्यातून वैशिष्ट्यपूर्ण काम करणाº्या महिला बचत गटाला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षी इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटाला डॉ. मनीभाई देसाई गौरव पुरस्कार, श्रीमती विजयाताई देशमुख मेमोरियल अवार्ड हा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाला. या पुरस्काराचे वितरण . गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी बचत गटाच्या महिलांच्या कामिगरीचा आढावा घेऊन कौतुक केले. अध्यक्षा माधुरी भगत, नंदाबाई गटखळ यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बचत गट उपयुक्त ठरला असल्याचे सांगितले. गटाचे मार्गदर्शक भगीरथ भगत, मीना गांगुर्डे यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.कार्यक्र म प्रसंगी बायफ संस्थेचे पदाधिकारी, गटाच्या अध्यक्षा माधुरी भगत, सुमित्रा भगत, सचिव नंदाबाई गटखळ, सुंदराबाई भगत, शिलाबाई भंडारी, बाळाबाई भगत आदी उपस्थित होते.
राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटाला मनीभाई देसाई गौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 16:06 IST
राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटाची स्वयंपूर्ण प्रगतीची घोडदौड अभिमानास्पद आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांची उन्नती करणाº्या या बचत गटाला सन्मानित करतांना अभिमान वाटतो असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटाला मनीभाई देसाई गौरव पुरस्कार
ठळक मुद्दे राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटाचे कार्य कौतुकास्पद : गृहराज्यमंत्री केसरकर ; राज्यस्तरीय पुरस्काराने बचत गटाच्या महिला सन्मानित