वाहनचालकाची पदेही आता आउटसोर्सिंग
नाशिक : महापालिकेच्या विविध विभागात असलेली वाहने चालविण्यासाठी महापालिकेने त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित संस्थेकडूनच चालकांची सेवा घेतली जाणार आहे. दोन वर्ष कालावधीसाठी बाह्यस्त्रोतांकडून चालकांची सेवा घेतली जाणार असल्याने याबाबतची निविदादेखील काढण्यात आलेली आहे.
कसारा घाटात पर्यटकांची गर्दी
नाशिक : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर नागरिकांना मनाई करण्यात आली असल्याने शहरातील नागरिक वीकेडंला कसारा घाटातील निसर्गसौंदर्य पाहाण्यासाठी गर्दी करीत आहेत. जवळच्या पर्यटनस्थळांवर पोलिसांचा बंदोबस्त असल्याने नाशिकमधून निघालेले पर्यटक थेट कसारा घाट गाठत आहेत.
ग्रामीण भागात वाढतायेत काेरोना रुग्ण
नाशिक : शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली तरी ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाला चिंता वाटत आहे. पहिल्या लाटेत मालेगाव तर दुसऱ्या लाटेत नाशिक शहरात कोरोनाने थैमान घातले होते. आता दुसरी लाट ओसरता ओसरता ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
खासगी रुग्णालयातही वाढली गर्दी
नाशिक : कोरोनाची लस विलंबाने मिळत असल्याने दुसऱ्या डोस घेणाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अधिक विलंबाची वाट न पाहाता अनेकांनी खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन लस घेण्याला प्राधान्य दिले आहे. पहिला डोस सरकारी रुग्णालयात घेणाऱ्यांना दुसरा डोस खासगी रुग्णालयातून विकत घ्यावा लागत आहे.