शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मानाच्या ताबुताचे कारागीर मुस्लीम अन् खांदेकरी हिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST

इस्लामी कालगणनेतील प्रत्येक हिजरी सनचा पहिला महिना म्हणून मुहर्रम ओळखला जातो. दहा दिवसांपूर्वीच हिजरी सन १४४३ ला प्रारंभ झाला ...

इस्लामी कालगणनेतील प्रत्येक हिजरी सनचा पहिला महिना म्हणून मुहर्रम ओळखला जातो. दहा दिवसांपूर्वीच हिजरी सन १४४३ ला प्रारंभ झाला असून, मुहर्रम महिना इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे प्रिय नातु शहीद-ए-आजम हजरत इमाम-ए-हुसेन यांच्या स्मृतींना उजाळा देणारा असतो.

याच महिन्यात दरवर्षी जुने नाशिकमधील सारडा सर्कल येथील इमामशाही टेकडीच्या परिसरात जातीय सलोख्याचे दर्शन घडते. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रोत्सव जरी होत नसला तरीदेखील पारंपरिक प्रथेनुसार सय्यद कुटुंबीयांच्या सातव्या अन् आठव्या भावीपिढीकडून मानाचा ताबुत तयार करण्यात आला आहे. या पारंपरिक प्रथेला मोठा इतिहास असून, स्वातंत्र्यपूर्वकाळापासून ही परंपरा अखंडित कलीम सय्यद यांच्या कुटुंबीयांसह हिंद महादेव कोळी कुटुंबीयांकडून श्रद्धेने जोपासली जात आहे.

--इन्फो--

बकरी ईदपासून ‘ताजिया’च्या उभारणीला प्रारंभ

ताजिया अर्थात ताबुत उभारणीचे वेध सय्यद कुटुंबीयांना बकरी ईद पार पडताच लागण्यास सुरुवात होते. साधारणत: महिनाभराच्या कालावधीत सय्यद कुटुंबातील सातवी पिढीतील युवक मुजफ्फर, मलिक, मीरअली सय्यद हे तिघे बंधू त्यांचे वडील ७५वर्षीय कलीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली येथे ताजिया उभारणीला प्रारंभ करतात. महिनाभराच्या अथक परिश्रमाने सुमारे नऊ फूट उंचीच्या ताबुताची उभारणी केली जाते.

--इन्फो--

...असा आहे मानाचा ताबुत

सुमारे ३० बांबूंचा वापर करत त्यापासूनच्या कामट्याच्या सहाय्याने ३३ लहान-मोठे मनोरे (मीनार) त्यावर २९ लाकडी कळस चढविले जातात. हे कळस वर्षानुवर्षांपासून कायमस्वरुपी तयार करून ठेवण्यात आलेले आहेत. यावर गोल्डन रंगाच्या चमकणाऱ्या कागदाचे वेष्टण लावले जाते. प्रारंभी बांबूंच्या कामट्यांचा वापर करत ताबुताचा साचा तयार झाला की त्याभोवती सुमारे तीन किलो कापूस ओला करून लावण्यात येतो. त्यानंतर त्यावर अळीवच्या बियांची एकप्रकारे पेरणी केली जाते. त्यामुळे आठवडाभरातच ताबुतावर हिरवळीचा साज चढलेला पहावयास मिळतो.

--इन्फो--

हे निभावतात खांदेकरीची भूमिका

येथील रहिवासी विष्णू डमाळे, नंदु खोकले, अनिल देशमुख, उत्तम खोंडे, संतोष पवार, श्याम भोईर, हिरामण मोरे यांच्यासह आदिंच्या कुटुंबातील पुरुष मंडळी मानाच्या ताबुताचे खांदेकरी होण्याची भूमिका बजावतात.

--कोट-

हजरत इमाम-ए-हुसेन यांच्या आठवणीत आमच्या पंजोबांच्या अगोदरपासून ताबुताची उभारणी केली जाते. १९४४ सालापर्यंत ताबुताचे विसर्जन गोदावरीच्या काठावर केले जात होते, असे ९२ वर्षीय आमचे चुलत बंधू सय्यद हुसेन सांगतात. तेव्हा तर माझा जन्मही नव्हता; मात्र मला जेव्हापासून समजायला लागले तेव्हापासून ताबुत काही कारणास्तव विसर्जित करण्याऐवजी दर्गा परिसरातच विधीवत दफन केला जातो. जेव्हापासून ही परंपरा सुरू झाली तेव्हापासून ताबुताचे खांदेकरीचा मान हा येथील हिंदू महादेव कोळी बांधवांकडेच आहे.

- कलीम सय्यद, इमामशाही दर्गा.

190821\19nsk_38_19082021_13.jpg~190821\19nsk_39_19082021_13.jpg~190821\19nsk_40_19082021_13.jpg

मानाचा ताबुत~ताबुत उभारणीचे सुरु असलेले काम ( सर्व छायाचित्रे :नीलेश तांबे)~ताबुत उभारणीचे सुरु असलेले काम ( सर्व छायाचित्रे :नीलेश तांबे)