शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ममदापूरला हातभट्ट्या उद्ध्वस्त

By admin | Updated: May 13, 2017 00:14 IST

ममदापूर : येथील राखीव क्षेत्रात वनविभागातर्फे राबविण्यात आलेल्या वन्यप्राणी गणना मोहिमेप्रसंगी गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कममदापूर : येथील राखीव क्षेत्रात वनविभागातर्फे राबविण्यात आलेल्या वन्यप्राणी गणना मोहिमेप्रसंगी प्रगणकांना अवैध हातभट्टीने दारू बनवित असल्याचे लक्षात आले. या गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर नुकतेच काळवीट, हरीण, लांडगे यांची प्रगणना वनविभाग व वन्यजीव संरक्षक समितीच्या वतीने करण्यात आली. संपूर्ण जंगलात ममदापूर, खंरवडी, देवदरी, वायबोथी, राजापूर येथील वन्यजीव संरक्षक समितीचे तीस ते बत्तीस तरुणांच्या साह्याने गणना करत असताना गणेश गायकवाड यांच्या टीमला फॉरेस्ट कम्परमेन्ट नंबर ५३१ मधील आडनदीच्या काठावर गावठी दारूसाठी लागणारे साहित्य झाडांच्या गर्दीत आढळून आले. ममदापूर येथे सात ते आठ ठिकाणी गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू असल्याचेही निदर्शनास आले. हातभट्टीवर दारू पाडताना काही व्यक्ती दिसल्या असता काही व्यक्तींनी लगेच वनविभागाच्या अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे सदर माहिती कळविली.  अवैध दारूभट्टयांबाबत माहिती कळताच वनरक्षक जे. के. शिरसाठ, एस. आर. सोनवणे तसेच वन्यजीव रक्षक बापू वाघ, काळू सोनवणे, गोरख वैद्य, विशाल पवार यांनी लगेच दाखल होत आडनदीच्या कडेला असलेल्या सर्व सात ते आठ दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. साधारण ३५ लिटर, ५० लिटर, ड्रम व टाक्यांमध्ये सडलेला गूळ, नवसागर इत्यादी रसायन असलेल्या टाक्या आढळून आल्या. तसेच या ठिकाणी सकाळी ९ वाजता तयार करण्यात आलेली पाच लिटर दारूसह ३० ते ३२ ड्रम, टाक्यादेखील जप्त करण्यात आल्या आहेत. चार हजार हेक्टर क्षेत्रात आणखी किती दारूभट्ट्या असतील याचा शोध वनविभागाचे अधिकारी व पोलीस घेतील काय, असा प्रश्न विचारला जात आहे.