शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मालुसरे ट्रस्टचे ‘दीपस्तंभ’ पुरस्कार जाहीर

By admin | Updated: January 11, 2015 01:04 IST

सोमवारी वितरण : शिंगाडे, पवार यांचा समावेश;

 नाशिक : येथील कॉ. नरेंद्र (नाना) मालुसरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘दीपस्तंभ’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आदिवासी कार्यकर्ते नाथा शिंगाडे, कामगार कार्यकर्ते विजय पवार, पत्रकार प्रशांत पवार यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील लोकमान्य टिळक शिक्षणसंस्थेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या सोमवारी (दि. १२) सायंकाळी ४ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. संस्थेचे विश्वस्त संजय मालुसरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. व्यक्तीला ११ हजार रुपये, तर संस्थेला २५ हजार रुपये, शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र, असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. कॉ. मालुसरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामगार, कष्टकरी आदिवासी, पत्रकारिता, शिक्षण या क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थेला हा पुरस्कार देऊन गौरवले जाते. यंदा या पुरस्कारासाठी पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी काम करणारे नाथा शिंगाडे, जळगाव जिल्ह्यातील कामगार कार्यकर्ते विजय पवार, भटक्या-वंचितांवर लिखाण करणारे पत्रकार प्रशांत पवार यांची निवड झाली आहे. आदर्श शिक्षण-संस्थेसाठीचा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील लोकमान्य टिळक विद्यामंदिराचे (चिखलगाव, ता. दापोली) राजाराम दांडेकर, रेणू दांडेकर हे स्वीकारतील. सोहळ्यास प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कळवणचे आमदार जिवा पांडू गावित हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. याप्रसंगी विश्वस्त अनुराधा मालुसरे, सुनीता मालुसरे, श्रीधर देशपांडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)