शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

गावात कुपोषण, शहरात अतिपोषण; कोरोनाकाळात वाढले मुलांचे वजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST

नाशिक : शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मुलांचे घराबाहेरचे बहुतांश खेळ यापूर्वीच बंद झालेले असल्याने ...

नाशिक : शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मुलांचे घराबाहेरचे बहुतांश खेळ यापूर्वीच बंद झालेले असल्याने मुले-मुली तासंतास मोबाइलवर खेळत बसल्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. शहरातील मुला-मुलींच्या वर्षभरातील नियमित वजनवाढीपेक्षा अधिकची वजनवाढ दिसून येत आहे. तर ग्रामीण भागात कामधंदा नसलेल्या पालकांच्या घरातील मुले सकस अन्नाअभावी कुपोषणाच्या समस्येने ग्रस्त आहेत.

घरातच राहून सातत्याने फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढल्याने स्थूलपणात वाढ झाल्याने अनेक मुलांची वजने वर्षभरात दहा ते बारा किलोहून अधिक वाढल्याच्या तक्रारी आहेत. अनेक घरांतील मुले तर मोबाइल हातात असल्याशिवाय जेवणदेखील करीत नाहीत, इतके मोबाइलचे व्यसन लागले आहे. तसेच घराबाहेर खेळणे, मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी कमी झाल्याने पायी चालणेदेखील जवळपास बंद झाले आहे. कोरोनापूर्वीच्या काळात अनेक घरांमध्ये मुलांना मोबाइलपासून लांब ठेवण्यात आले होते. किंवा फार तर काही वेळासाठीच मोबाइल हातात मिळत होता. त्यामुळे शाळा, क्लासेस, मैदानी खेळ त्यात मुलांना थोडेफार तरी शारीरिक श्रम, कष्ट पडत होते; पण ऑनलाइन शिक्षणामुळे ते श्रमदेखील घटल्यामुळेच वजनवाढीची समस्या दिसून येत आहे.

कोट

मैदाने आणि अन्य क्रीडा संकुलेदेखील बंद असल्याने नियमित खेळणाऱ्या मुला-मुलींनाही घरातच थांबून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या फिटनेसमध्येदेखील घट झाली असून, घरीच थांबल्याने त्यांच्या वजनातही मोठी वाढ होऊ लागली आहे. मुला-मुलींच्या वजनातील वाढदेखील त्यांच्या खेळावर आणि वजनावर परिणाम करणारी ठरत आहे.

- जयंत महाजन, पालक

कोट

मुलांना खेळण्यासाठी किमान सोसायटीत किंवा घरातील हॉलमध्ये कोणताही एखादा खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे आवश्यक झाले आहे. तर ग्रामीण भागात शासनाकडून दिला जाणारा पोषक आहार पोहोचतो की नाही, त्याची खातरजमा शासनाने करणे आवश्यक आहे.

- शंकर माळोदे, पालक

कोट

आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात उच्च उष्मांकयुक्त अन्न सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पौष्टिक घटक मिळत नाहीत; मात्र शरीरावर अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढू लागते. त्याचप्रमाणे कोरोना काळातील लहान मुलांची जीवनशैलीही लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरत आहे. तर ग्रामीण भागातील बालकांना पुरेसे पोषक अन्न घटक मिळत नसल्याने त्यांच्यात कुपोषण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

- डॉ. सुयश नाईक, बालरोग तज्ज्ञ

ही आहेत कारणे

मुले घरात बसून मोबाइल स्क्रीनच्या आणि टीव्हीच्या संपर्कात राहू लागल्याने केवळ बसून किंवा झोपून लोळत सर्व वस्तू हाताळण्याची पडलेली सवयच स्थूलपणा वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे.

मोबाइलचा वापर केवळ अभ्यासासाठी करताना अन्य वेळ मोबाइल हातात देणेच बंद केल्यास मुले किमान घरात तरी इतर खेळ खेळतील आणि त्यांच्या वजनात घट येऊ शकेल.

लहान मुलांमधला लठ्ठपणा टाळण्यासाठी सर्वप्रथम त्यांना मैदानावर खेळण्यास आणि नियमित व्यायाम करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवे. पोहणे आणि सायकलिंगसारखे व्यायाम निश्चितच लाभदायक ठरू शकतात.

त्याशिवाय आहारावर नियंत्रण असले पाहिजे. फास्ट फूड खाण्यावर नियंत्रण आणले पाहिजे. शीतपेय पूर्णपणे बंद करण्याबरोबरच आहार आणि निद्रा यांचा समतोल असायला हवा.