शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

मालेगावी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

By admin | Updated: September 27, 2016 23:16 IST

मालेगावी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

आझादनगर : येथील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. विजेच्या समस्येवरून कंपनीचे अधिकारी व उद्योजक, राजकीय व्यक्ती यांच्यात शाब्दिक संघर्ष होत आहे; परंतु या संघर्षात सामान्य नागरिकांना महिनाभर अंधाराचा सामना करावा लागला आहे.शहरातील जळालेले व बंद रोहित्र त्वरित बदलून सामान्यांची या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. मालेगाव शहर यंत्रमाग व्यवसायावर अवलंबून आहे. त्यातच या व्यवसायावर आलेल्या मंदीमुळे यंत्रमागधारक व मजूरवर्ग हवालदिल झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीतून हा व्यवसाय कसाबसा मार्गक्रमण करीत असताना त्यांना महावितरणच्या भोंगळ कारभाराचाही सामना करावा लागत असल्याने यात आणखी एका समस्येची भर पडली आहे. शहरात रौनकाबाद भागातील रोहित्र २८ आॅगस्ट रोजी जळाले. त्यामुळे या भागातील सर्व यंत्रमाग कारखाने बंद पडले आहेत. हे विद्युत रोहित्र बदलण्यासाठी परिसरातील यंत्रमागधारकांनी महावितरणकडे अनेकवेळी पाठपुरावा केला. यात महावितरण व यंत्रमागधारकांत वाद झाले. हे सर्व होत असल्याने मात्र सर्वसामान्य नागरिकांना मंदीतही आर्थिक झळ सोसावी लागली, तर परिसरातील सर्वसामान्यांना २५ दिवस अंधारात रात्र काढावी लागली. असे अनेक ठिकाणी शहरात घडत आहे.महावितरणच्या बेशिस्त कारभार व काही आर्थिक लाभाच्या अपेक्षेमुळेही रोहित्रांचे काम जाणीवपूर्वक लांबविले जात आहे. महावितरण विभागाने या समस्येकडे त्वरित लक्ष देत शहरातील जळालेले रोहित्र त्वरित बदलावे व नागरिकांची विजेअभावी होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. (प्रतिनिधी)