शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : सत्तेचा पाठशिवणीचा खेळ सुरू राहणार का?

By admin | Updated: November 1, 2014 22:05 IST

मालेगावकरांना यंदा मंत्रिपदाची आशा

संगमेश्वर : सत्तेच्या पाठशिवणीचा खेळ यंदा तरी संपणार का? याकडे मालेगाव बाह्यमधील समस्त कार्यकर्ते व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.पूर्वाश्रमीचा दाभाडी मतदारसंघाचे आता मालेगाव बाह्यमध्ये रूपांतर झाले आहे. पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघाने कायम सत्तेच्या बाजूने कौल दिल्याने त्याचे फळ म्हणून नेहमी मंत्रिपदे या मतदारसंघाला मिळाली आहेत. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, डॉ. बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे यांनी या मतदारसंघातून वेळोवेळी विजय मिळवत राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविले होते. सत्ताधारी पक्षाची पाठराखण झाल्यामुळे विकासकामांना गती मिळते. नवनवीन प्रकल्प मंजूर करून घेणे सोपे जाते, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र २००४ व २००९ च्या निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदारसंघाने शिवसेनेला विजयी केले. राज्यात कॉँग्रेस आघाडीची सत्ता तर मालेगाव बाह्यमध्ये त्यांचा विरोधक असलेल्या शिवसेनेला प्रतिनिधीत्व असे चित्र होते. विरोधी पक्षाचा आमदार झाल्याने दहा वर्षांपासून राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची परंपरा खंडित झाली.यंदा २०१४च्या निवडणुकीत दादा भुसे यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. यावेळी कॉँग्रेस आघाडीला पराभवास जावे लागल्याने राज्यात भाजपा मित्रपक्षांचे सरकार आले आहे. यावेळी तरी भाजपा शिवसेना यांचे सरकार येऊन सत्तेच्या पाठशिवणीचा खेळ संपेल व मालेगाव बाह्यचे आमदार भुसे यांना मंत्रिपदाची संधी मिळेल. त्यायोगे या भागाच्या विकासाला अधिक गती मिळू शकेल, शेती, पाणी, बेरोजगारी, शिक्षण आदि प्रश्न जलद गतीने सोडविण्यास मदत होईल. या भागाला पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळून दहा वर्षाची प्रतीक्षा यंदा संपेल असा आशावाद कार्यकर्ते व मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर वरिष्ठ पातळीवर भाजपा सेनेतील ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे ही आशा कितपत खरी होते याविषयी संंभ्रमाचे वातावरण आहे.