शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी : कॅम्प परिसरातील ४० वर्षे जुने शौचालय स्लॅब कोसळून दोन महिला जखमी

By admin | Updated: June 12, 2015 23:34 IST

मालेगावी : कॅम्प परिसरातील ४० वर्षे जुने शौचालय स्लॅब कोसळून दोन महिला जखमी

 मालेगाव : येथील कॅम्प श्रीकृष्णनगरमध्ये गुरुवारी सकाळी निकृष्ट कामामुळे सार्वजनिक शौचालयाचा स्लॅब कोसळून दोन महिला शौचालयाच्या टाकीत पडल्या. त्यापैकी गर्भवती महिला गंभीर जखमी झाली.कॅम्प श्रीकृष्णनगरमध्ये शौचालय किमान ३५ ते ४० वर्षे जुने आहे. मुळात जुन्या व तकलादू असलेल्या या शौचालयांची मोठी दुरवस्था झाली आहे. सकाळी व संध्याकाळी येथे नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. २००८ मध्ये या शौचालयाच्या नूतनीकरणासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत अकरा लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. ते या कामावर खर्च करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविण्यात देखील आले. याप्रकरणी तत्कालीन आयुक्त सुधीर राऊत यांनी दाखल तक्रारीवरून संबंधित अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच त्यांनी केलेला खुलासा अमान्य करत त्याविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेशही दिले होते. मात्र त्यानंतर खुद्द आयुक्त राऊत यांचीच येथून बदली झाली. त्यामुळे सदर शौचालयांचे खरंच अकरा लक्ष रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले का, हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. तसेच संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध मनपा प्रशासनाने काय कारवाई केली हेदेखील आतापर्यंत गुलदस्त्यातच राहिले आहे. येथील वाढत्या लोकसंख्येला श्रीकृष्णनगरचे शौचालय अपुरे पडत असल्यामुळे नागरिकांनी अधिक सीटचे शौचालय व इतरत्रही शौचालय निर्मितीची मागणी केली आहे. मनपाकडून याप्रश्नी कागदोपत्री घोडे नाचविले जात आहेत. मात्र गेल्या तीन वर्षात प्रत्यक्षात कामास सुरुवात झालेली नाही. मनपाने येथील मोडकळीस आलेल्या शौचालयांची केवळ कामापुरती डागडुजी केली असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मात्र त्यामुळे हे शौचालय अधिकच मोडकळीस आली आहेत. त्याचाच दुष्परिणाम म्हणून गुरुवारी सकाळी या ठिकाणी महिला शौचालयात असताना अचानक स्लॅब कोसळल्याने दोन महिला शौचालयाच्या टाकीत पडल्या. त्यापैकी एका महिला दरवाजा घट्ट पकडून टाकीबाहेर पडण्यात यशस्वी झाली. मात्र दुसरी महिला ही गर्भवती असल्यामुळे तिला मोठ्या यातना सहन कराव्या लागल्या. इतर महिलांनी आरडाओरड केल्यानंतर या महिलेस शौचालयाबाहेर काढण्यात यश मिळाले. (प्रतिनिधी)