शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर

By admin | Updated: August 30, 2016 00:50 IST

आयटकच्या विविध संघटनांचा मोर्चा

मालेगाव : येत्या शुक्रवारी, दि. २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी संपास पाठिंबा दर्शविण्यासाठी आयटकच्या वतीने विविध संघटनांतर्फे आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.इस्कस लायब्ररी येथून मोर्चास प्रारंभ झाला. नवीन बसस्थानक, शिवाजी पुतळा, मोसमपूल, महात्मा फुले पुतळ्यामार्गे मोर्चा प्रांत कचेरीवर आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी प्रा.के.एन. अहिरे यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. प्रांताधिकारी अजय मोरे यांना मोर्चेकऱ्यांतर्फे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आशा, आशा गटप्रवर्तक, मनरेगा कर्र्मचारी, ग्रामरोजगार सेवक, एन.आर.एच. एम. कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस सेविका, संगणक परिचालक, वाहनचालक, पाणलोट कर्मचारी, पोषण-आहार आदि योजनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा. पॉवरलूम कर्मचाऱ्यांचे मंडळ स्थापन करा, तयार झालेल्या घरकुलांचे त्वरित वाटप करा, घर कामगार मोलकरींच्या बंद केलेल्या योजना त्वरित सुरू करा, सन्मानधन व मंडळाच्या योजनांचा त्वरित लाभ द्या, किमान वेतन दरमहा सर्व कर्मचाऱ्यांना १८ हजार द्या, मोर्चामध्ये वाल्मीक देवरे, ललित वाघ, श्रीमती मंगला मिश्रा, अतित शेख, प्रकाश भावसार, चित्रा वाणी, प्रमोद देवरे, राजू निकम, शोभा सावकार, सुरेखा खैरनार, शशिकांत अहेर, नामदेव आहिरे, विजय गायकवाड, आशा काकळीज, माया घोलप सहभागी झाल्या होत्या. मोर्चात घरकामगार मोलकरीन संघटना, म.रा. आरोग्य आशा व आशा गटप्रवर्तक संघटना, म. रा. ग्रामरोजगार सेवक संघटना, पॉवरलूम कामगार संघटना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कर्मचारी संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ, वीज वर्कर्स फेडरेशन नाशिक जिल्हा, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, वाहनचालक संघटना, बांधकाम कामगार कर्मचारी संघटना ईपीएफ ९५ पेन्शनर्स फेडरेशन नाशिक जिल्हा, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना, किसान सभा नाशिक जिल्हा, लालबावटा शेतमजूर युनियन, डी.एड. व बी. एड. बेरोजगार समिती सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)