शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव मनपाची एप्रिलमध्ये निवडणूक

By admin | Updated: February 17, 2017 00:49 IST

आढावा : प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन

 नाशिक : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नाशिक महापालिकेची निवडणूक आटोपत नाही तोच मालेगावसह राज्यातील सहा महापालिकांची एप्रिलमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केले असून, त्यापार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे विभाजन, तसेच प्रभाग रचना व आरक्षणाची माहिती जाणून घेण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीच्या सूचना केल्या आहेत. मालेगाव, भिवंडी-निजामपूर, लातूर, परभणी, चंद्रपूर व पनवेल या सहा महापालिकांची मुदत मे महिन्यात संपुष्टात येत असून, तत्पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नगरसेवकांची निवड होणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. गुरुवारी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी या सहाही महापालिकेचे आयुक्त तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संपर्क साधला व माहिती घेतली. या महापालिकांच्या प्रभाग रचना यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या असून, आरक्षणही काढण्यात आलेले आहे. त्यामुळे आता प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन करण्यात येणार आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याने मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर आगावू कामे पूर्तीसाठी धावपळ उडणार आहे.