शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी जंगल झाले विरळ

By admin | Updated: August 15, 2014 00:37 IST

मालेगावी जंगल झाले विरळ

 

मालेगाव : शहरातील म्हाळदे, सवंदगाव, द्याने, दरेगाव, आझादनगर, बापू गांधीनगर, इस्लामपुरा, मोसम नदीकाठ, कॅम्प आदि भागांत किरकोळ लाकूडविक्री केंद्रे - वखारी अवैधरीत्या बिनदिक्कतपणे सुरू आहेत. अगदी अलीकडच्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी घनदाट असणारे तालुक्यातील जंगल आता अतिविरळ होत चालले आहे. या सर्व प्रकारास वन, महसूल व पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत.शहरात चाळीसगाव - कन्नडमार्गे रोज साधारण १० ते १५ अवैधरीत्या लाकूड वाहतूक करणारे ट्रक दाखल होत असतात. मालेगाव तालुका व धुळे तालुका भागातून, महाराष्ट्र - गुजरात सीमावर्ती भाग, बागलाण तालुका येथून ही मोठ्या प्रमाणात शहरात लाकूड आणले जाते. यापैकी काही ट्रक लाकूड हे नियमितपणे बंगलोर येथील फर्निचर कारखान्यात पाठविले जातात. याकडे मात्र वनविभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनास त्याची सुतराम कल्पना नाही यावर कोण विश्वास ठेवणार? गेल्या दहा वर्षांत वनविभाग, महसूल विभाग व पोलीस विभागाने अवैध वृक्षतोडीविरोधात किती कारवाया केल्या? किती जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले? याची आकडेवारी सर्वसामान्य जनतेसमोर यायला हवी. वनविभागाचा निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे शासनाच्या ‘झाडे लावा, झाडे जगवा’ मोहिमेला हरताळ फासला गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यावरण व वन्यजीवसृष्टी धोक्यात आलेली आहे. या वाढत्या जंगलतोडीमुळेच बिबट्यासह इतर जंगली प्राण्यांचे नागरी वस्तीत घुसणे व जीवितहानी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. मालेगाव शहर - तालुक्यात अवैध वृक्षतोड व लाकडाची चोरटी वाहतूक होत नसल्याचा दावा करणाऱ्या वन - महसूल व पोलीस प्रशासनाने फक्त शहरात येणारे व वापरले जाणारे लाकूड येते कोठून याचा खुलासा करून पर्यावरण ऱ्हासास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.