शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी कडकडीत बंद

By admin | Updated: February 16, 2017 00:52 IST

मच्छिंद्र शिर्केंवरील हल्ल्याचे पडसाद : दोघांना अटक; पोलिसांचा सौम्य लाठीमार

मालेगाव : गो-रक्षा समितीचे मच्छिंद्र शिर्के यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे बुधवारी शहरात तीव्र पडसाद उमटले. हिंदू रक्षा समितीने पुकारलेल्या मालेगाव बंदला पश्चिम भागात प्रतिसाद मिळाला. पश्चिम भागात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला होता. विविध सामाजिक, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्के यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे यांना निवेदन देण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात कारवर दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. जुना आग्रारोडवर दगडफेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला पिटाळून लावले. दिवसभरातील दगडफेक व मारहाणीच्या घटनेमध्ये चार जण जखमी झाले. हल्ल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केलीे. जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेख फारूख शेख शकील यांना मारहाण केल्याप्रकरणी सुभाष मालू यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगावच्या पश्चिम भागात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, इतर पक्ष, सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून रस्तारोको आंदोलन केले. यावेळी शिर्के यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधाचे व संशयित आरोपींना तातडीने अटक करुन कारवाई करावी या मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी मोरे यांना देण्यात आले. यावेळी प्रदीप बच्छाव, नगरसेवक सुनील गायकवाड, अशोक कांकरिया, सतिष कजवाडकर, बन्सीलाल कांकरिया, उमाकांत कदम, नगरसेवक मदन गायकवाड, यशवंत खैरनार, विवेक वारूळे, निखिल पवार, रवींद्रकुमार जैन, अनिल नागमोती, सोहनलाल जैन, देवा पाटील, संजय काळे, राजेंद्र शेलार, शिवसेनेचे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख कैलास तिसगे, सहसंपर्क प्रमुख प्रमोद शुक्ला, आदिंसह विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तत्पूर्वी येथील मोसमपूल चौकात पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते व पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक उडाली . मोर्चेकरी मोसमपूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जात असताना जमावातील अज्ञात इसमाने कार क्रमांक एमएच ०२ जेपी ०४६७ हिच्यावर दगडफेक केली. या हल्ल्यात कार मालक मोहंमद जाकीर (२८) रा. जगतापगल्ली, संगमेश्वर व एजाज अहमद (२२) हे दोघे गंभीर जखमी झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यानंतर दिवसभर शहरात तणावपूर्ण शांतता होती. जुना आग्रारोडवर सुंदरा पॅलेसजवळ ट्रकवर दगडफेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला पोलिसांनी पिटाळून लावले. दरम्यान, शिर्के यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी जहीरखान उर्फ जहीर बिल्ली (२६), इम्रानखान उर्फ भुऱ्या ड्रायव्हर (२८) दोघे रा. मोमीनपुरा यांना अटक केली आहे.