शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणात संस्कृत भाषा अनिवार्य करावी

By admin | Updated: September 16, 2015 23:21 IST

स्वरूपानंद सरस्वती : भारत साधू समाजाचे कुंभ महाअधिवेशन

त्र्यंबकेश्वर : प्राथमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांत संस्कृत भाषा अनिवार्य करावी, तिचा पाठ्यक्रमात समावेश करावा. त्याचबरोबर वैदिक शिक्षणदेखील सुरू करावे, असे प्रतिपादन ज्योतिषपीठाधिश्वर तथा द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केले. भारत साधू समाजाच्या कुंभ महाअधिवेशनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या या अधिवेशनास स्वामी सागरानंद सरस्वती, जुन्या आखाड्याचे महंत नारायणगिरी महाराज, अग्नि आखाड्याचे सचिव महंत गोविंदानंद ब्रह्मचारी, उदासीन बडा आखाड्याचे सचिव महंत दुर्गादास, निम्बाकाचार्यांचे उत्तराधिकारी श्यामशरण, संतोष मुनीजी, रामकृष्णदास, कबीर पंथाचे निर्मलदास, धर्माचार्य हरिनारायणानंद, दंडीस्वामीअनि मुक्तेश्वरानंद सरस्वती, महंत जनमेजयशरण (अयोध्या), महंत नारायणगिरी, महंत गंगादास, महाधिवेशन प्रभारी श्री महंत गोपालानंद, सभापती अग्नि आखाडा आदि साधू-महंत, पदाधिकारी उपस्थित होते.स्वरूपानंद पुढे म्हणाले की, तुम्ही सर्वजण कुशावर्त कुंडात, नाशिकच्या गोदावरीत सिंहस्थ स्नान करून पवित्र व्हाल आणि त्यानंतर शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन अपवित्र होणार हे योग्य आहे काय? सनातन धर्मातील देवदेवतांच्या मंदिरातील साईच्या मूर्ती, प्रतिमा हटविण्यात, सर्व साधू-संतांनी यासाठी प्रयत्न करावेत, संसदेत राममंदिर बांधण्याचा कायदा करावा, देशभर गोवंश हत्त्याबंदीचा कायदा करावा, धर्म परिवर्तन होऊ नये म्हणून साधूंनीच पुढाकार घ्यावा यांसह १३ प्रस्ताव या महाधिवेशनात मंजूर करण्यात आले. त्याला सर्व साधू-महंतांनी हात वर करून दुजोरा दिला.इतर धर्मातील लोकांना धार्मिक कार्यासाठी स्वदेशातील पैसे येतात तर सरकार आमचे मठ-आश्रम-मंदिरे यांना कर लावत आहेत. त्यामुळे हा कर आकारणीचा कायदा रद्द करावा. सरकार धर्मनिरपेक्ष असू शकते पण व्यक्तिनिरपेक्ष असूच शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या धर्माचे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. शाळा, विद्यालय, महाविद्यालयांतून रामायण, महाभारत, भगवद्गीता शिकवावी, असे आवाहन करायलाही ते विसरले नाहीत. हरेरामाचार्य रामकृष्णानंद, निम्बाकाचार्य, महंत दुर्गादास आदिंनी प्रस्तावांचे वाचन केले. तर महामंत्री स्वामी हरिनारायणानंद यांनी सूत्रसंचालन केले.