शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रेय गुंतवणूकदारांचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:40 IST

नाशिक :मैत्रेय उपभोक्ता तथा अभिकर्ता असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि़ २१) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला़ निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि., मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि., मैत्री रिअलटर अ‍ॅण्ड कन्ट्रक्शन प्रा. लि., मैत्री सुवर्णसिद्धी प्रा. लि. या कंपन्यांची मालमत्ता विक्री करून परतावा देण्याच्या आराखडा जाहीर करण्याच्या मागणीसाठी मैत्रेय उपभोक्ता तथा अभिकर्ता असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि़ २१) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला़ निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ दरम्यान, या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली होती़ मैत्रेय कंपनीतील गुंतवणूकदारांना कंपनीकडून परतावा मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ या मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या ‘कष्टाचा पैसा मिळालाच पाहिजे’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ या घोषणांनी शहर परिसर व जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता़ गोल्फ क्लब मैदानापासून सुरू झालेला मोर्चा गंजमाळ सिग्नल, प. सा. नाट्यगृह, महात्मा गांधी रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला़ मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना परतावा नेमका केव्हा व किती दिला जाईल याचा आराखडा जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांची होती़ मैत्रेयमध्ये महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरील २७ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदारांचे २८०० कोटी रुपये अडकून पडले आहेत़ ५ फेबु्रवारी २०१६ पासून कंपनी बंद पडली असून, गुंतवणूकदारांना परतावा दिलेला नाही़ मैत्रेयसंदर्भात शासन काय कारवाई करते याची माहिती मिळावी, अशी मागणी असोसिएशनचे गोपाल बडगुजर, सचिन अमृतकर, रवींद्र सुतार, चतुर देसले यांनी खेडकर यांच्याकडे केली. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मैत्रेय गुंतवणूकदारांच्या संदर्भात केवळ नाशिक जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचाच प्रश्न निकाली काढण्यात येईल, असा स्पष्ट आदेश दिला आहे. मात्र हा निर्णय संपूर्ण राज्यात लागू करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कंपनीतील गुंतवणूकदारांच्या संपूर्ण माहितीचा डेटा सरकारवाडा पोलीस ठाण्यात जमा असून, त्यानुसार लवकरात लवकर परतावा देण्याची मागणीही यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली़