शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य बाजारपेठा बंद; उपनगरात सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:15 IST

नाशिक : कोराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने ब्रेक द चेन धोरण आखले असून, त्यामुळे अत्यावश्यक सेवावगळता सर्व ...

नाशिक : कोराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने ब्रेक द चेन धोरण आखले असून, त्यामुळे अत्यावश्यक सेवावगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याच्या आदेशाला मंगळवारी (दि.६) मुख्य बाजारपेठांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. दुकाने बंद असली तरी नागरिकांची वर्दळ कमी झाली नाही. तसेच मुख्य बाजारपेठ आणि मुख्य रस्तेवगळता उपनगरात आणि अन्यत्र दुकाने सुरूच होती.

कोरोनाचा संसर्ग वाढत असून, लॉकडाऊन टाळण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, शनिवार व रविवार पूर्णत: व्यवहार बंद असल्याने सोमवार ते शुक्रवारदरम्यान दुकाने, व्यवसाय आणि खासगी ऑफिसेस सुरू ठेवायचे काय, याबाबत सोमवारी संभ्रमाचे वातावरण होते. जिल्हा प्रशासनाकडून त्याला ठाेस उत्तर सुरुवातीला मिळाले नाही. मात्र सायंकाळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर अत्यावश्यक सेवावगळता अन्य सर्वच खासगी आस्थापना बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र तरीही अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये संभ्रम कायम असल्याचे मंगळवारी (दि.६) दिसून आले.

नाशिक शहरातील मध्यवर्ती बाजारपेठा सामान्यत: सकाळी ९ वाजेनंतरच सुरू होतात. त्यातच पोलिसांनी बाजारपेठेकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेडने अडवून ठेवले होते. मात्र, यानंतरही अनेक व्यापारी - व्यावसायिकांनी दुकाने उघडण्याच्या तयारीने कामगार- कारागिरांना बोलवून ठेवल्याने दुकानाच्या बाहेर आणि चौकात अनेक घोळके उभे होते. शहरातील सराफ बाजार, भांडी बाजार, कापडपेठ, मेनरोड, शिवाजीरोड, गाडगे महाराज चौक, रविवार कारंजा, शालिमार अशा सर्वच भागात दुकाने पूर्णत: बंद होती. केवळ खाद्यपदार्थ, उपाहारगृह तसेच औषध दुकानेच सुरू हाेती. काही भागात फेरीवाले वस्तूंची विक्री करीत असल्याचे आढळले. गंगापूररोड, त्र्यंबकरोड, कॉलेजरोड या भागातही दुकाने बंद होती. मात्र, अंतर्गत कॉलनी, काही व्यापारी संकुले येथे शटर अनेक दुकाने सहजपणे सुरू होती.

इन्फो..

उपाहारगृह, मिसळ विक्री अशा अनेक ठिकाणांहून केवळ पार्सल सेवाच सुरू हेाती. खाद्यपदार्थ आणि भाजीपाल्याची दुकाने सुरू असल्याने नागरिकांना फारशी गैरसोय पहिल्या दिवशी जाणवली नाही. मात्र अनेक ठिकाणी अर्धे शटर डाऊन करून दुकाने सुरू असल्याचेही आढळले.

इन्फो...

सिडकोत घरातच दुकाने असलेली अनेक छोटी दुकाने सुरू होती. नाशिकरोडला उपनगरात दुकाने खुली असल्याचे चित्र होते. पंचवटीत वेगळी स्थिती नव्हती. काही भागात तर बंदचा मागमूसही नव्हता. सातपूरला मुख्य बाजारपेठेत बंदचे वातावरण असले तरी कारखाने सुरू असल्याने कामगारांची वर्दळ कायम होती.