त्र्यंबकेश्वर : महिरावणी गावाजवळ सतत होणाºया अपघातांना आळा घालण्यासाठी गतिरोधक बसविण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत शासकीय यंत्रणेने पाहणी दौरा करून माहिती घेतली आहे. लवकरच गतिरोधक टाकण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिरावणी गावाजवळ महाविद्यालये असून, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. अपघातात अनेकांचा मृत्यू झालाआहे. याबाबत महिरावणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश खांडबहाले यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार करून रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. मंगळवारी पुन्हा अपघाताची घटना घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या महिरावणी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असताना ग्रामीण वाहतूक पोलीस निरीक्षक संदीप कोलेकर तसेच सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता तांबे आणि देवरे यांनी महिरावणी गावाजवळ भेट देऊन कोणत्या ठिकाणी गतिरोधकाची गरज आहे याची माहिती घेतली. त्याची जागा निश्चित करण्यात आली. लवकरच गतिरोधक टाकण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. याप्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच रमेश खांडबहाले तसेच संदीप फाउण्डेशनचे प्राचार्य प्रशांत पाटील, प्रा. मन्सुरी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
महिरावणी येथे अपघातांमध्ये वाढ गतिरोधक टाकणार : अधिकाºयांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:20 IST
महिरावणी गावाजवळ सतत होणाºया अपघातांना आळा घालण्यासाठी गतिरोधक बसविण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत शासकीय यंत्रणेने पाहणी दौरा करून माहिती घेतली आहे.
महिरावणी येथे अपघातांमध्ये वाढ गतिरोधक टाकणार : अधिकाºयांकडून पाहणी
ठळक मुद्देया ठिकाणी सतत अपघात रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रागतिरोधक टाकण्याची ग्वाही